
समांतर क्रांती / बेळगाव
फरार असलेल्या पतीने त्याची पत्नी परपुरूषासमवेत गेल्याची तक्रार केली. त्यांने त्याची पत्नी परत मिळवून देण्याची मागणी त्यांने पोलिसांकडे केली. हे कमी म्हणून की काय? ‘तिला’ पळविलेल्या इसमाच्या पत्नीने आपला पती ‘तिने’ पळविल्याचा आरोप करीत त्याला परत मिळवून देण्याची मागणी करीत चक्क पोलिस स्थानकासमोरच ठाण मांडले आहे. या प्रकरणामुळे आता चक्रावण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथील एका व्यक्तीने त्याची पत्नी फरार झाल्याची तक्रार मारिहाळ पोलिसांत कांही दिवसांपूर्वी केली होती. आपल्या पत्नीला ताब्यात द्यावे, अशी मागणी त्यांने केली होती. पण आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. पळून गेलेल्या बसवराज नामक व्यक्तीच्या पंचायत सदस्य असलेल्या पत्नीने आता पोलिसांत धाव घेतली आहे.
मोसाबी नावाच्या महिलेसमवेत आपला पती पळून गेला असून त्याने आपल्या मुलांनाही सोबत नेले असल्याचे सांगत तिने आज रविवारी (ता.१९) चक्क पोलिस स्थानकासमोरच धरणे धरत पती व मुले मिळवून देण्याची मागणी केली आहे. नवरा मिळेपर्यंत हलणार नाही असा इशारा तिने दिल्याने पोलिस मात्र चक्रावले असून काय करावे, हेच पोलिसांना सुचेनासे झाले आहेआता पोलिस काय करणार? याकडे मारिहाळमधील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
.

खानापूर को-ऑप बँकेचा निकाल कधी?
समांतर क्रांती / खानापूर खानापूर को ऑ. बँकेचे मतदान होऊन आठवडा लोटला आहे. मात्र, अद्यापही निकाल न लागल्याने मतदारांसह सभासद आणि तालुक्यातील जनतेची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. आज सोमवारी (ता.२०) या निकालासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता आहे. रविवार दि. १२ रोजी खानापूर को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीने ७४ टक्के मतदान झाले. विद्यमान संचालकांचे सहकार पॅनेल […]