
समांतर क्रांती / खानापूर
भीमगड अभयारण्यांतर्गत येणाऱ्या मालकी जंगलात हरणाची शिकार केल्याप्रकरणी लोंढा आणि खानापूर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत रणजित जयसिंग देसाई, बळवंत नारायण देसाई, प्रमोद नामदेव देसाई, गोविंद रामचंद्र देसाई, आत्माराम यल्लाप्पा देवळी, दत्तराज विलास हवालदार, ज्ञानेश मंगेश गावडे, अप्पी इंगाप्पा हणबर आणि बाराप्पा बाबू हणबर यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
लोंढा वनविभागात येणाऱ्या नेरसे येथील सर्व्हे नं. १०४/२ मधील जंगलात हरिणाची शिकार करून विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असतांना उपरोक्त नऊ संशयीत आरोपींना वनाधिकाऱ्यांनी मुद्देमालासह अटक केली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर शिकार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
जिल्हा उपवनसंरक्षक मारिया क्रिस्टो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत खानापूरच्या सहायक उपवनसंरक्षक सुनिता निंबरगी, खानापूरचे वनक्षेत्रपाल श्रीकांत पाटील, लोंढ्याचे सहायक वनक्षेत्रपाल वाय.एस.पाटील आणि भीमगड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सय्यदसाब नदाफ व कर्मचारी सहभागी झाले होते.
भीमगड अभयारण्याच्या घोषणेनंतरही नेरसे आणि शिरोली परिसरात शिकारी केल्या जात आहेत. अलिकडे शिकारींची संख्या वाढली असून वनखाते सतर्क झाले आहे. स्थानिक वनकर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताने हे प्रकार वाढीस लागल्याची चर्चा आहे.

खानापूर ते कोल्हापूर आणि कित्तूर-धारवाड ते हिंडलगा कारागृह..
समांतर क्रांती / गुन्हेवृत्त गवंडी काम करतानाच चोऱ्यांचा नाद जडलेल्या तरूणांने अनेक ठिकाणी घरफोड्या करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलिसांची तारांबळ उडविली होती. पण, पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या. हलशी येथील महादेव धामणेकर या अंतरराज्य चोरट्याला अटक करून त्याकडून सुमारे २० लाखांचे दागिणे जप्त करण्यात कित्तूर पोलिसांना यश आले आहे. संशयीत महादेव धामणेकर हा कोल्हापूरमध्ये गवंडीकाम […]