समांतर क्रांती / खानापूर
मध्यवर्ती म.ए.समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मऱ्याप्पा पाटील यांचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे
अध्यक्ष नारायण कापोलकर होते.
प्रारंभी सचिव वासूदेव चौगुले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानच्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे विविध उपक्रम हाती घेऊन ते सक्षमपणे राबविण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. यावेळी बोलतांना अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी, प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य केले जाणार आहे. त्याशिवाय स्पर्धापरिक्षांसाठीची तयारी करण्यासाठीही वाचनालयाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य केले जाणार आहे. त्याशिवाय वाचनालयाकडून वाचकांना विविध पुस्तकांची मेजवाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.लवकरच वाचनालयासाठी सदस्य नोंदणीला सुरूवात केली जाणार असून तालुक्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसह विविध क्षेत्रातील चोळखंद वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या बैठकीचे औचित्य साधून प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मऱ्याप्पा पाटील व विठ्ठल गुरव यांची मध्यवर्ती म.ए.समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष श्री. कापोलकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. पाटील यांनी सीमाप्रश्नाच्या लढ्यात यापुढेही प्रामाणिकपणे योगदान देण्याचे अभिवचन दिले.
यावेळी खजिनदार ईश्वर बोबाटे, प्रा.डॉ. आय.एम.गुरव, दत्ता गावडे, बाबाजी पाटील, ग्रंथपाल चेतन लक्केबैलकर आदींसह सदस्य उपस्थित होते. प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.

‘धूम स्टाईल’ बेतली जिवावर..दुचाकीस्वार ठार
समांतर क्रांती / खानापूर धबधबे फेसाळू लागल्याने शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी जांबोटी-कणकुंबी भागात वर्षा पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे स्थानिक त्रस्त झाले असतांनाच धूम स्टाईल दुचाक्या हकणाऱ्या तरूणांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी (ता.२९) चोर्ला महामार्गावर हब्बनहट्टी फाट्यानजिक दुचाकीस्वाराने कँटरला समोरासमोर धडडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला तर अन्य एकजण गंभीर […]