
समांतर क्रांती / खानापूर
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक अवस्थेत स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख झाल्यास भविष्यात त्यांना करिअरची वाट निवडणे सोपे ठरते. स्पर्धा परीक्षा, करिअर घडवण्याचे सर्वात उत्तम माध्यम आहे. त्या दृष्टीने पालकांनी अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी पोषक वातावरण निर्माण करावे. मनाजोगे करिअर निवडून समाज व राष्ट्रसेवेचा राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेत. सातत्य, सराव आणि चौफेर वाचनातून कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येते, असे प्रतिपादन पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले.

खानापुरातील मास्टर ब्रेनडिट एज्युकेशन संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आयएएस टॉपर्स कोचिंग क्लासेसच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक प्रा. संदीप देशमुख होते. खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. बिरादार, खानापूर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा, निवृत्त मुख्याध्यापिका उमा घारशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. Competitive exams are the best way to build a career.
याप्रसंगी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना चौगुले म्हणाले, तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता ठासून भरली आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि कौशल्यांना दिशा देण्यासाठी उत्तम व्यासपीठाची गरज होती. आयएएस टॉपर्स कोचिंग क्लासमुळे ती पूर्ण झाली आहे. सर्व विषयांचे तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, सराव चाचण्या आणि स्पर्धा परीक्षांची विस्तृत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबरोबरच बँकिंग, केंद्र व राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये खानापूर तालुक्यातील युवक-युवतींचा टक्का वाढण्यास मदत होईल.
पोलिस उपनिरीक्षक श्री. बिरादार म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सर्वस्व समर्पणाची तयारी असायला हवी. विद्यार्थ्यांनी अडचणींना न घाबरता आतापासूनच ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात करावी. डिजिटल युगामुळे माहितीचा विस्फोट झाला आहे. त्याचा सदुपयोग करून स्वतःचे करिअर घडवण्याचा प्रयत्न करावा.
डॉ. नाडगौडा यांनी आयएएस टॉपर्स कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांना एका दर्जेदार स्पर्धा परीक्षा केंद्राची सोय झाली आहे. येथील सुविधांचा व तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी पालकांची स्वप्ने साकारावीत, असे सांगितले. संस्थापक संदीप देशमुख म्हणाले, गेल्या उन्हाळी सुट्टीत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यातूनच तालुक्याची गरज ओळखून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला सुरुवात करण्याची संकल्पना सुचली. महिन्याभरात मुलांमध्ये परिवर्तन घडवून आलेले दिसून येईल. यावेळी उमा घारशी, गिरीधर पाटील यांच्यासह शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

अनमोड घाटात ‘महामार्ग’ धोक्यात; रस्ता खचण्याची शक्यता
समांतर क्रांती / अनमोड सध्या गोव्याचा प्रवास सुखाचा नाही, तर धोक्याचा बनला आहे. एकीकडे कुसमळी पुलामुळे चोर्ला महामार्गावरील अवजड वाहतूक रोडावली असतांना आता अनमोड घाटातील महामार्गावरील वाहतूक सुध्दा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनमोड घाटात महामार्गावर भेगा पडल्या असून रस्ता खचण्याचा धोका आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रामनगर ते अनमोड घाटातील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने […]