
समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील बेकवाड येथील शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल पाटील या शेतकऱ्याची बैलजोडी बुधवारी (ता. १६) तलावात बुडून मरण पावली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांनी बेकवाड या ठिकाणी गुंजाप्पा पाटील या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. प्रसाद पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी कायम असतात. Garlgunji Gram Panchayat member Prasad Patil rushed to the aid of a farmer in Bekwad.
याभेटी प्रसंगी शेतकरी कुटुंबाला धीर देत आपण या दुःखात सहभागी आहोत आणि अशी दुर्घटना कोठेच घडू नये, अशी भावना व्यक्त केली. जीवाभावाची बैलजोडी डोळ्यादेखत पाण्यात बुडाल्याने शेतकरी कुटुंबामध्ये दुःखद वातावरण आहे. प्रसाद पाटील यांनी स्वतः त्या कुटुंबाला १० हजार रूपयांची आर्थिक मदत केली. शेतकरी पाटील यांचा याप्रसंगी गहिवरून दाटून आला. यावेळी सदानंद पाटील, रामचंद्र लोहार उपस्थित होते.


लोंढा: अपघातात एक जागीच ठार
समांतर क्रांती / लोंढा Londa: One killed on the spot in accident. रामनगर -धारवाड मार्गावरील लोंढा पोलीस स्थानक हद्दीतील घार्ली क्रॉसजवळ कारने झाडाला धडक दिल्याने एक ठारजण झाला. अपघातात तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर कार (के.ए. २२ पी ६३२५) हुबळीहून गोव्याकडे निघाली होती. घार्ली क्रॉसजवळील वळणावर चालकाचा ताबा […]