
समांतर क्रांती / खानापूर
नुकताच खानापूर पोलिसांनी मोठी कारवाई करीत चार वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यात तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असतांना अद्यापही शहरातील चोरीच्या घटनांना ब्रेक लागलेला नाही. दोन दिवसांपूर्वी शहरातील पेट्रोल पंपवर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविली आहे. मणतुर्गा येथील विठ्ठल शांताराम पाटील यांनी हिरोहोंडा – स्प्लेंडर दुचाकी (KA22 EG9891) पेट्रोलपंपवर लावली होती. ती अज्ञातांनी चोरली आहे. अनेक ठिकाणी शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने त्यांनी खानापूर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. सदर दुचाकी आढळल्यास 9008944620 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


असेही दातृत्व; बेकवाडच्या शेतकऱ्याला बैलजोडी सुपूर्द
समांतर क्रांती / नंदगड समाजात आजही अनेक दानशूर व्यक्ती आहेत, जे संकट काळात धावून येतात. त्याची प्रचिती गेल्या आठवडाभरात आली. बेकवाड येथील शेतकरी गुंजाप्पा पाटील यांची बैलजोडी पाण्यात बुडून त्यांना ऐन हंगामात मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यांना अनेकांनी आर्थिक मदत करीत दिलासा दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनेनंतर तात्काळ […]