
समांतर क्रांती / खानापूर
वडगाव- बेळगाव येथील के.एल.ई.चे शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर गर्लगूंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलूर या गावांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतले जाणार आहे. प्रसाद पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचे या पंचायत क्षेत्रातील नागरीकांतून कौतूक होत आहे.
गर्लगुंजीसह इतर पंचायतींना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस के.एल.ई. शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलचे एमबीबीएस- एमडी डॉक्टर आरोग्य तपासणीसाठी गावात उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर मोफत ॲम्बुलन्स सेवा, मोफत किंवा वाजवी दरात औषधे त्याचबरोबर या गावातून जे रोगी हॉस्पिटलमध्ये जातील त्यांना मोफत आरोग्य तपासणीबरोबर ऑपरेशन किंवा इतर खर्चिक बाबींसाठी वेगवेगळ्या स्कीममधून बिलांमध्ये सवलत दिली जाणार आहे.
बऱ्याच दिवसापासून प्रसाद पाटील यांनी यासाठी पाठपुरावा चालविला होता. केएलई संस्थेने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केएई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या जन्मदिनापासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे, केएलई शताब्दी चारिटेबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई यांनी सांगितले. तसेच याबाबतचे पत्र त्यांनी प्रसाद पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रभावती उपस्थित होत्या. त्याचबरोबर निट्टूर ग्रा.पं. चे सदस्य नागेश नार्वेकर हेही उपस्थित होते. आपल्याला केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी असलेले संतोष, विजय आणि सागर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. गरीबांना अत्यल्प दरात उपचार मिळतात, त्यामुळे एक हजारहून अधिक रुग्णांना या हॉस्पिटलमधून बरे करून घेतले असल्याचे यावेळी प्रसाद पाटील यांनी सांगितले.
या हॉस्पिटलच्या ब्लड बँकमधून ही भरपूर गरजूंना रक्त देता आल्याचे आणि इतर हॉस्पिटल मधील पेशंटचे जीव वाचविल्याचे समाधान मिळाले, असे ही प्रसाद यांनी नमूद केले. रेशन कार्ड, आधार कार्ड, यशस्विनी, वाजपेयी आरोग्य श्री आणि इतर योजनामधून रुग्णांना लाभ मिळविता येतो. नागरिकांनी या हॉस्पिटल आणि योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसाद पाटील यांनी केले आहे.


‘जलजीवन मिशन’साठी नंदगड जेसीएस शाळा आवार वेठीस
समांतर क्रांती / खानापूर नंदगड येथील जॉईंट सेंट्रल स्कूलच्या आवारात ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत जलवाहिनी घातली गेली आहे. पण, त्या कामासाठी आवारातील रस्ते, मैदानात खोदाई करण्यात आली. परिणामी, खड्डे पडले आहेत. तसेच चिखलामुळे विद्यार्थ्यांना आवारात वावरणे मुश्किल झाले आहे. ग्राम पंचायतीने या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष चालविल्यामुळे पालक-विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आधीच मद्यपींचा अड्डा बनत […]