
समांतर क्रांती / खानापूर
नंदगड येथील जॉईंट सेंट्रल स्कूलच्या आवारात ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत जलवाहिनी घातली गेली आहे. पण, त्या कामासाठी आवारातील रस्ते, मैदानात खोदाई करण्यात आली. परिणामी, खड्डे पडले आहेत. तसेच चिखलामुळे विद्यार्थ्यांना आवारात वावरणे मुश्किल झाले आहे. ग्राम पंचायतीने या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष चालविल्यामुळे पालक-विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आधीच मद्यपींचा अड्डा बनत असलेल्या या शाळा आवारात कंत्राटदाराने जलजीवन मिशनचे साहित्य, जलवाहिन्या ठेवल्या आहेत. तसेच कामगारांच्या राहण्याची सोयदेखील तेथेच करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळांसाठी अडचण होत आहे. शालेय स्पर्धांचा काळ असताना अशा प्रकारे अडचण निर्माण केल्यामुळे पंचायतीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

‘जलजीवन मिशन’अंतर्गत शाळा आवारात खोदाई करण्यात आली, त्यानंतर चरी व्यवस्थित बुजविण्याची आवश्यकता होती. पण, कंत्राटदाराने जलवाहिन्या घातल्यानंतर तशीच माती ओढल्यामुळे आवारात आणि खेळाच्या मैदानात चिखल झाला आहे. निसरडीमुळे विद्यार्थी पडून जखमी होत आहेत. जॉईंट स्कूलमध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू शाळा आहेत. या शाळांमध्ये ग्राम पंचायत सदस्यांची मुलेही शिकतात, तरीही त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शाळा परिसरात झाडी
शाळा परिसराला झाडीने वेढले आहे. शाळेतील गळक्या खोल्या ही तर नेहमीचीच समस्या होऊन बसली आहे. शाळेत अनेक समस्या असतांना त्याकडे सुध्दा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष, विकास अधिकारी आणि सदस्यांसह शाळा सुधारणा समितीने सुध्दा कानाडोळा केल्याने संताप व्यक्त होत आहे. समस्या तात्काळ न सुटल्यास विद्यार्थ्यांसह ग्राम पंचायतीला घेराव घालण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. नुकताच या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून लवकरच जिल्हाधिकारी शाळेला भेट देणार आहेत. कांही दिवसांत मुख्यमंत्री सिध्दरामय्या नंदगड येथे येणार आहेत, तेव्हा पंचायतीचा वेंधळा कारभार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला जाणार असल्याचे समजते.


आबासाहेब.. अष्टपैलू व्यक्तिमत्व..
एखादा माणूस किती प्रतिभावंत असावा? विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारी माणसं क्वचितच आढळतात. अशा माणसांच्या अंगी हे जे अष्टपैलू गुण असतात, ते वारसा हक्काने तर येतातच. शिवाय त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांच्या वर्तमानाला प्रकाशमय करून सोडतात. विशेष म्हणजे अशी माणसं समाजासाठी आदर्शवत दीपस्तंभ बनतात. असेच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे आबासाहेब नारायणराव दळवी. तेजस्वी यशाची गरूडभरारी घेतांना त्यांना त्यांच्या […]