समांतर क्रांती / खानापूर
सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात तसेच मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत, या मागणीसाठी ११ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारकात आयोजित करण्यात आली आहे. तरी आजी -माजी लोकप्रतिनिधी तसेच समितीप्रेमी कार्यकर्त्यांनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.


डॉ. अंजली निंबाळकर उद्या डीसीसीसंदर्भात भूमिका जाहीर करणार का?
समांतर क्रांती / खानापूर Will Dr. Anjali Nimbalkar announce her position regarding DCC tomorrow? तालुक्यात सध्या अनेक समस्यांनी नागरीक त्रस्त असतांना कोणत्याच पक्षनेत्यांचे याकडे लक्ष नाही. सगळेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांत रमले आहेत. भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर, काँग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळ्ळी आणि विद्यमान संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी त्यांच्यापरिने मोर्चेबांधणी सुरू केली […]