
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर शहरांतर्गत महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांचे जीव कवडीमोल बनले आहेत. दररोज घडणाऱ्या अपघातांनी प्रवाशी त्रस्त आहेत. मात्र, पाऊस थांबल्यानंतरही खड्डे भरण्यास संबंधीत खात्याकडून हयगय केली जात आहे. पाऊस संपल्यानंतर रस्त्यांची डाडुजी करू, अशी ग्वाही देणाऱ्या आमदारांनी सुध्दा पाठ फिरविल्याचे दिसत असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.
न्यायालय ते रुमेवाडी क्रॉस व पुढे करंबळ नाक्यापर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. गेले दोन महिने चिखल आणि पाणी साचलेल्या खड्ड्यांत प्रवास करतांना प्रवाशांची पुरेवाट लागली असतांना आता धुळीने प्रवाशांना नकोसे करून सोडले आहे. शहरातील जांबोटी क्रॉस ते मलप्रभा नदीवरील पुलापर्यंत धुळीमुळे प्रवाशीच नव्हे तर व्यापारी सुध्दा हवालदिदल झाले आहेत.

खड्ड्यांची समस्या जैसे थे असल्याने अपघातांची संख्या वाढतच आहे. सोमवारी (ता. ४) जांबोटी क्रॉसजवळ रस्त्यावरील खड्डा चुकवितांना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. याचवेळी तेथून पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी जात होते. त्यांनी सदर तरूणाला रिक्षातून दवाखान्यात दाखल केले. हे असे अपघात जीवघेणे ठरत असून सनासुदीच्या काळात अपघातांचा आलेख वाढण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना कधी जाग येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
नगरसेवक झोपलेत का?

शहरांतर्गत रस्त्याच्या डागडुजीकडे नगर पंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. पण, नगर पंचायत रस्त्याच्या डिव्हायडरवील झाडे जोपासण्यात गुंतली आहे. शहरातील कोणत्याच समस्येकडे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे लक्ष नसल्याने ते झोपलेत का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.


हारूरीच्या महिलेची हालात्रीत आत्महत्या
समांतर क्रांती / खानापूर मानसिक अस्वस्थतेतून महिलेने हालात्री नाल्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी नारायण पाटील (वय ६५, रा. हारूरी) असे या महिलेचे नाव असून गेल्या कांही वर्षांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मी यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. […]