
समांतर क्रांती / नंदगड

सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नंदगड येथील कुंभार गल्लीत घडली आहे. वेदांत सतीश गडकरी असे या दुर्देवी बालकाचे नाव आहे. वेदांत हा रात्री झोपेत असतांनाच अंथरूणात सापाने दंश केला होता. त्याला तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेबद्दल नंदगडात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खानापूर: ६० वर्षे रुग्णांची सेवा केलेली इमारत जमिनदोस्त
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर Khanapur: Building that served patients for 60 years razed to the ground माणसाच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की, विकासाच्या नावाखाली इतिहास पुसला जात आहे. दशकानुदशके दु:ख, आनंद, वेदनांच्या आठवणी कवेत घेऊन उभ्या असणाऱ्या शासकीय इमारती जमिनदोसस्त होत आहेत. पण, त्याचे कुणालाच कांही वाटत नाही. एकेकाळी लोकवर्गणीतून उभी राहिलेली खानापूर शहरातील […]