
समांतर क्रांती / खानापूर
नाल्याचे पाणी कचानक वाढल्यामुळे वाटरमन दुचाकीसह वाहून गेल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे. घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिसात झाली आहे.
गाडीकोप्प येथील वाटरमन सुरेश निजगुणी गुंडेन्नावर (34) हे चंदनहोसूर येथील नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त करून गावी परतत असताना नाल्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्यात दुचाकीसह वाहून गेले, असे पोलिसांनी सांगितले.
सदर घटना तारिहाळ हद्दीत घडली असून हिरेबागेवाडी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपास सुरु आहे.


जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : युतीला कुणाची भिती?
समांतर क्रांती / खानापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप युती निश्चित झाली आहे. त्याची घोषणादेखील झाली. आमदार विठ्ठल हलगेकर आणि आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांनी गळ्यात गळे घालून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तालुक्यातील समस्यांकडे अजिबात लक्ष नसलेल्या या द्वयींनी कृषीपत्तीन संघांच्या संचालकांवर अश्वासनांची खैरात सुरू केल्याची चर्चा जोरात रंगली असून त्यांना अनेक अनपेक्षित अनुभवांना सामोरे जावे […]