
समांतर क्रांती / खानापूर
होनकल केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धा 2025-26 पूर्ण प्राथमिक मराठी शाळा रुमेवाडी येथे नुकताच संपन्न झाल्या. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष गणेश हल्याळकर होते. यावेळी मणतुर्गा शाळा सुधारणा समिती अध्यक्ष ईश्वर बोबाटे, समुह संपन्मूल व्यक्ती मुल्ला यांच्यासह होनकल केंद्रातील शाळांचे एसडीएसमसी अध्यक्ष, सदस्य आणि मुख्याध्यापकांसह शिक्षक उपस्थित होते. ईश्वर बोबाटे यांनी गोळाफेक करून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी उद्योजक गणेश मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
रूमेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश
रुमेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मार्गर्दशन लाभले.
वैयक्तिक विभाग मुली
- काव्या कृष्णा चौगुले गोळा फेक- प्रथम क्रमांक
- काव्या कृष्णा चौगुले 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक
- काव्या कृष्णा चौगुले 80 मीटर अडथळा शर्यत प्रथम
- संजीवनी प्रकाश ठाकर गोळा फेक तृतीय क्रमांक
- राधिका जोतिबा गुरव थालीफेक तृतीय क्रमांक
- काव्या कृष्णा चौगुले हिने अव्वल (champion) खेळाडूचा मान मिळविला.
- सांघिक खेळ मुली : कबड्डी -प्रथम क्रमांक, थ्रो बॉल -द्वितीय क्रमांक, हॉलीबॉल द्वितीय क्रमांक
वैयक्तिक विभाग मुले
- बालाजी जोतिबा चौगुले 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक
- बालाजी जोतिबा चौगुले गोळा फेक तृतीय क्रमांक
- सांघिक खेळ मुले : कबड्डी- प्रथम क्रमांक, हॉलीबॉल द्वितीय क्रमांक

खानापुरात घरफोड्या; दोघांची रवानगी कारागृहात
समांतर क्रांती / खानापूर शहराच्या विविध भागात घरफोड्या केल्याच्या आरोपावरून दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. दीपक उर्फ रोहन नागेंद्र मातंगी (मूळचा हलकर्णी-खानापूर सध्या रा. मच्छे) व शिवनागय्या मतय्या उमचगीमठ (मूळचा गुजमागडी-गदग सध्या रा. हुबळी) अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८६.०६ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. […]