
समांतर क्रांती / रामनगर
Heavy traffic closed through Anmod Ghat for two more months; Pressure on ‘Chorla’ will increase. अनमोड घाटात महामार्ग खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आणखी दोन महिने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद राहणार असल्याने चोर्ला महामार्गावरील ताण आणखी वाढणार आहे. चोर्ला महामार्गावर दोन दिवसांपूर्वी तब्बल दहा तास चक्काजाम झाला होता. अनमोड घाटातील अवजड वाहतूक सुरळीत होईयपर्यंत अशा घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनावर सुध्दा ताण वाढला आहे.
५ जुलै रोजी अनमोड घाटात महामार्गाची एक बाजू पूर्णता खचली. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आली होती. पण, पावसामुळे अद्याप रस्ता दुरूसस्तीचे काम पूर्ण होऊ न शकल्याने आणखी दोन महिने अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. परिणामी, चोर्ला आणि रामनगर-कारवार मार्गावरील ताण वाढणार आहे.


डीसीसी बँक निवडणूक: हे ‘बंधन’ तुटणार का?सावकारांची ‘एन्ट्री’ ठरणार निर्णायक!
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आता अधिकृतपणे निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच जागांसाठी निवड अविरोध करण्यासाठी ‘सावकारां’नी शर्त चालविली असल्याने खानापूरच्या जागेचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्या अनपेक्षित माघारीने खानापूरच्या संचालकपदाच्या […]