समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट शिक्षक दिनी प्रदर्शित झाला आणि सगळीकडे पुन्हा एकदा चार्ल्स सोबराज हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चर्चेत आला. त्याला ६ एप्रिल १९८६ साली गोव्यात दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. तेव्हा गोव्याहून मुंबईला नेतांना त्याला खानापुरात आणले होते. तेव्हा त्या घटनेची चर्चा जोरात रंगली होती. तत्पूर्वी, तो खानापुरात एका हॉटेलमध्ये दिसल्याच्याही वावड्या उठल्या होत्या.
डॉन की तलाश गॅरह मुलको की पुलिस कर रही हे, लेकीन डॉन को पकडना मुश्किल ही नही बल्की नामुनकीन है.. हा केवळ डॉन चित्रपटातील डॉयलॉग नाही, तर तो डॉयलॉग प्रत्यक्ष २० खूनासह विविध गुन्हे करून अर्ध्या जगात दहशत पसरविलेल्या चार्ल्स सोबराजचा आहे.
व्हीएतनाममध्ये जन्मलेल्या सोबराज याचे वडील भारतीय होते, तर आई व्हीएतनामी होती. त्याने ६० आणि ७० च्या दशकात अर्ध्या जगात त्याच्या गुन्हेगारी कारवायांनी दहशत माजविली होती. त्याने २० खून केले होते. त्याला बिकीनी किलर म्हणून ओळखले जात होते. अर्ध्या जगाचे पोलिस ज्या सोबराजला शोधत होते, त्याला १९७६ साली भारतात अटक करण्यात आली. पण, १९८६ मध्ये तो तिहार जेलमधून पसार झाला. दरम्यान, ६ एप्रिल १९८६ रोजी त्याला म्हापसा-गोवा येथील ओ-कोकेरो हॉटेलमध्ये मुंबईचे तत्कालीन इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी अटक केली. यावेळी त्याला मुंबईला नेतांना खानापूर पोलिस स्थानकात आणले होते.
गोव्यात अटक करण्यापूर्वी चार्ल्स सोबराज हा खानापूरात दिसल्याच्या अफवा सुध्दा त्याकाळी पसरल्या होत्य. त्यामुळे खानापूर पोलिसांची बरीच धावपळ झाली होती. त्याच कारणामुळे जेव्हा त्याला गोव्यात अटक करण्यात आली तेव्हा त्याला मुंबईला नेतांना खानापुरात आणले होते. ५ सप्टेंबर रोजी त्याच्यावर इन्सपेक्टर झेंडे हा चौथा चित्रपट पदर्शित झाला आहे. यापूर्वी त्याच्यावर द सर्पेंट, मै और चार्ल्स, शॅडो ऑफ द कोबरा असे चित्रपट निघाले. ते खूप गाजले होते. इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे खानापुरातील त्याच्या भेटीच्या आठवणीदेखील ताज्या झाल्या आहेत.
जन्मठेपेच्या शिक्षेमुळे नेपाळच्या जेलमध्ये संपूर्ण आयुष्य घालविलेला सोबराजची २०२२ मध्ये सुटका झाली. तो सध्या फ्रान्समध्ये राहतो.

डीसीसी बँक निवडणूक : मंत्री सतिश जारकीहोळ्ळींच्या समोरच पत्नीने पतीला थोबाडले
समांतर क्रांती / बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीचे रान पेटले असून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. काल सोमवारी (ता.९) सकाळी माजी खासदार रमेश कत्ती यांनी अपहरण केलेल्या कृषीपत्तीन संचालकांची सुटका झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, दुपारी अथणी तालुक्यातील मदहळ्ळी येथे कृषीपत्तीनच्या संचालकाच्या पत्नीने पतीला चक्क पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्यासमोरच थोबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. […]