समांतर क्रांती / खानापूर
खानापूर शहर म्हणजे कचऱ्याचे आगार बनले आहे. शहराच्या प्रमुख चौकांसह उपनगरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पण, याकडे लक्ष द्यायला नगरसेवक आणि नगर पंचायत प्रशासनाला वेळच नाही. कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती, पण ती मोहीमही तकलादू ठरली आहे.
शहरातील बसस्थानकासमोर मांगरीश हॉलच्या बाजुला परिसरातील दुकानदार बिनदिक्कत कचरा टाकत असल्याने कचऱ्याचा जणू डोंगर साचला आहे. हा कचरा रस्त्यावरर सुध्दा पसरत आहे. त्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरीकांना नाक मुठीत धरावे लागते. कचऱ्यामुळे कुत्र्यांचा प्रादूर्भाव वाढला असून धोका निर्माण झाला आहे.
शहरातील इतर भागांचीदेखील हीच स्थिती आहे. उपनगरांची तर दारूण आवस्था आहे. पण, नगरसेवकांचे शहराच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे नगर पंचायत सभागृह अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

आमदार हलगेकर पहिल्यांदाच गरजले.. वनाधिकाऱ्यांना सुनावले!
समांतर क्रांती / नंदगड वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (ता.१२) आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नंदगड भागातील शेतवडीत जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वनाधिकाऱ्यांना धारेवर धरत तुमच्या प्राण्यांना आवरा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा सज्जड इशाराच दिला. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अधिकाऱ्यांवर गरजले. त्यामुळे उपस्थित वन खात्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीदेखील पाचावर धारण बसली. गेल्या […]