समांतर क्रांती / नंदगड
वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (ता.१२) आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नंदगड भागातील शेतवडीत जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वनाधिकाऱ्यांना धारेवर धरत तुमच्या प्राण्यांना आवरा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा सज्जड इशाराच दिला. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अधिकाऱ्यांवर गरजले. त्यामुळे उपस्थित वन खात्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीदेखील पाचावर धारण बसली.
गेल्या कांही दिवसांपासून नंदगड भागात रानडकरांनी अक्षरश: उच्छांद मांडला असून भात आणि ऊस पिकाचे प्रचंड नुकसान चालविले आहे. याबाबत आमदारांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ नंदगड येथील शेतवडीत जाऊन पाहणी केली. आमदार शेतवडीत पाहणीसाठी गेल्याचे समजताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांसह त्यांचे कर्मचारीही तेथे दाखल झाले.

यावेळी आमदारांनी नवाधिकाऱ्यांना धारेवर धरत तुमच्या प्राण्यांना आवरा. एकतर वनखात्याकडून व्यवस्थित भरपाई दिली जात नाही. त्यात प्राण्यांना कांही झाल्यास शेतकऱ्यांना जबाबदार धरले जाते. प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होते, त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तुम्ही तुमच्या प्राण्यांना आवरा नाही तर नाईलाजास्तव आम्हाला त्यांना आमच्या परिने आवरावे लागेल, असा इशारा दिला.
यावेळी खानापूर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल श्रीकांत पाटील यांनी त्यांच्याकडे ठोस उपाययोजना अखण्याची हमी दिली. प्रसंगी बाळू पाटील, राजू पाटील, प्रशांत लक्केबैलकर, यल्लाप्पा गुरव आदींसह शेतकरी उपस्थित होते.

अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार? सभासदांत कुतुहल
समांतर क्रांती / खानापूर निवडणुकीनंतर येथील खानापूर को-ऑप बॅंकेत वादांची वावटळ उठली असून आज शनिवारी (ता.१३) होणारी तिसरी शतकोत्तर सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. चेअरमन आणि त्यांच्याच पॅनेलच्या संचालकांत धुसपूस सुरू असल्याने आजच्या सभेत अनेक प्रश्नांना चेअरमन अमृत शेलार यांना सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. बँकेत शेलारविरुध्द शेलार अशी स्थिती आहे. धाकट्या शेलारांनी […]