समांतर क्रांती / खानापूर
वारंवार होत असलेल्या अस्वलांच्या हल्ल्याबद्दल पश्चिम भागातील कणकुंबी-चोर्ला परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वनखात्याकडून अस्वलांना अवरले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड नाराजी पसरली असून आंदोलनाचा इशारा या भागातून देण्यात आला आहे.
सहा महिन्यात तिसरा हल्ला
काल रविवारी हुळंद येथील वासुदेव नारायण गावडे यांच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिती असल्याचे समजते. पण, त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. गेल्या सहा महिन्यातील ही अस्वल हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जून २०२५ रोजी कणकुंबी येथील दशरथ वरंडेकर (वय ६०) यांच्यावर अस्वलाने हल्ला केला होता, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. २ डिसेंबर २०२४ रोजी मान येथील सखाराम महादेव गावकर (६३) यांच्यासह त्यांच्या पत्नीवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली होती.
संतापाची लाट
अस्वलाच्या हल्ल्यात जायबंदी झालेल्या जखमींच्या उपचाराचा खर्च जरी वनखात्याकडून दिला जात असला तरी त्यांच्या कुटुंबीयांवर मात्र उपासमारीची वेळ आलेली आहे. जखमींचे पुढील संपूर्ण आयुष्य आंथरूणाला खिळून राहते. त्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न गंभीर बनतो. असे असतांना त्यांना भरपाई दिली जात नाही. तसेच वनखाते अस्वलांना आवरण्यात अपयशी ठरत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

खानापुरात सकल मराठा समाजाची उद्या मंगळवारी बैठक
समांतर क्रांती / खानापूर येथील सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक उद्या मंगळवारी (ता. १६) ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खानापूर शहर आणि तालुका परिसरातील मराठा समाजाला कशा पद्धतीने आपले नाव […]