समांतर क्रांती / खानापूर
शिवस्मारकातील सभागृहात बोलाविण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत आज गुरुवारी (ता. 25) काय निर्णय घेण्यात आला? याबाबत मराठी भाषिकात उत्सुकता आहे. बैठकीत सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या सत्काराचा विषय चेर्चेला आला. यावेळी कार्यक्रमाचा खर्च कोण करणार यावरून बरीच खलबते झाली, पण निर्णय होऊ शकला नाही.
यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील यांनी मराठा समाजाने जातीनिहाय जनगणतीत जात मराठा, पोटजात कुणबी आणि भाषा मराठी अशी नोंद करावी, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते.
यावेळी बोलताना कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले, मराठा जातीत अनेक पोटजाती आहेत. त्यामुळे नोंदणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. मराठा समाज एकसंध होण्यासाठी ही नामी संधी आहे. त्यासाठी समाजातील सर्वांनी काळजीपूर्वक ही माहिती द्यावी.
बैठकीत प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, अनंत पाटील, डी. एम. भोसले, पांडुरंग सावंत, रुकमान्ना झुंजवाडकर यांची भाषणे झाली.

दोन वर्षांच्या ‘गौरी’चा मृत्यू
समांतर क्रांती / जोयडा तालुक्यातील पणसोली हत्ती शिबिरात वाढलेली ‘गौरी’ नावाची दोन वर्षांची मादी हत्ती आज आजारपणामुळे मृत्यूमुखी पडली. गौरीचा जन्म पणसोल्ली वन्यजीव वसाहतीतच झाला होता. गेल्या महिन्याभरापासून तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने सतत उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरीची शवचिकित्सा करण्यात आली असून, […]