समांतर क्रांती / खानापूर
शाळेच्या आवारात एकाचा मृतदेह आढळून आल्याने काही काळ खळबळ माजली होती. पण, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पालकांनी निःश्वास सोडला.
ही घटना घडली रामनगर येथे. सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाकला गेलेल्याना शाळेच्या मैदानावर मृतदेह दिसला. तातडीने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तात्काळ हालचाली करून मृतदेहाची ओळख पटविली. सदर व्यक्ती कुंभारवाडा येथील उमेश नाईक (42) याचा असल्याचे स्पष्ट झाले.
उमेश हा रामनगर येथील एका क्वारीवर ट्रकचालक म्हणून काम करीत होता. अतिमद्य प्राशनाने मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

समांतर क्रांती इफेक्ट : आमगावला आली जाग, काँग्रेसकडून दखल
समांतर क्रांती / खानापूर ‘जोयडा जात्यात, खानापूर सुपात’ या शिर्षकाखाली ‘समांतर क्रांती’ने भीमगड अभयारण्यातील गावांच्या स्थलांतराबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल अनेक पातळ्यांवर घेण्यात आली. आमगाव येथील ग्रामस्थांनी सोयी-सुविधा पुरविल्याशिवाय स्थलांतर करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. तसेच खानापूर तालुका काँग्रेसकडूनही या वृत्ताची दखल घेण्यात आली असून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट […]