समांतर क्रांती / बंगळूर
आज बुधवारी (ता. 29) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्री संगोळी रायण्णा विकास प्राधिकरणाच्या बैठक पार पडली. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून विविध मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत विनंती करण्यात आली, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खालीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत.
✅ रस्त्यांच्या विकासासाठी पुरेसा निधी
✅ डी. देवराज मेट्रिक नंतरच्या मुलांच्या वसतिगृहाची उभारणी
✅ अनुसूचित जाती व जमातींसाठी मेट्रिक नंतरच्या मुला/मुलींच्या वसतिगृहांची उभारणी
✅ मराठी आणि कन्नड भवन उभारणी
✅ मुरारजी देसाई निवासी शाळा
✅ एपीएमसी परिसरातील अपूर्ण समुदाय भवन पूर्ण करण्यासाठी निधी
✅ कसबा नंदगड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांना प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नेमण्याची विनंती
✅ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सरकारी इमारती, अंगणवाडी, शाळा व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ₹१० कोटींच्या निधीची मागणी केली.

काळादिन जागृतीला नंदगड येथे मराठी भाषिकांचा उदंड प्रतिसाद
समांतर क्रांती / नंदगड सीमावासियावर कर्नाटक सरकारने चालविलेल्या अन्यायाने कळस गाठला आहे. गेल्या 68 वर्षांपासून आपण न्याय्य हक्कासाठी लढत आहोत. आपला लढा न्याय मिळेपर्यंत निरंतर सुरु राहील. अन्यायाला आंदोलनाने उत्तर द्यावे लागेल, त्यासाठी मराठी भाषिकांनी काळ्यादिनी आपले व्यवहार बंद ठेऊन सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन आज नंदगड येथील जागृती फेरीदरम्यान खानापूर म. ए. समितीने केले. […]