
समांतर क्रांती / खानापूर
बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये भरविले जाते. हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाला विरोध म्हणून पुढील सोमवारी (ता.८) मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषक नागरिकांनी या महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीनंतर शहरात पत्रके वाटून जागृती करण्यात आली.
खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक आज शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष गोपाळ देसाई होते. गुरूवारी (ता. ४) होणाऱ्या ‘राष्ट्रवीर’कार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार वितरण सोहळ्यास खानापूर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
बैठकीनंतर ज्ञानेश्वर मंदिरात निवृत्त शिक्षक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी जाऊन देखील महामेळाव्यासंदर्भात समिती पदाधिकारी जनजागृती करण्यात आली. बैठकीला समिती कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते विलास बेळगावकर, खजिनदार संजय पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम देसाई, अमृत शेलार, बी. बी. पाटील, विठ्ठल गुरव, प्रभाकर बिरजे, विनायक चव्हाण, जयराम देसाई, शंकर सडेकर, म्हात्रू धबाले, वसंत नावलकर, मऱ्याप्पा पाटील, ए. एम. पाटील, डी. एम. भोसले, वाय. बी. पाटील, जे. बी. पाटील, एस.बी.पाटील, एम. जी. पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विश्वकर्मा मंदिर ट्रस्टतर्फे गुणी युवकांचा सन्मान
समांतर क्रांती / खानापूर खानापूर येथील विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्यावतीने नुकताच सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल ट्रस्टचे सभासद दीपक सुतार यांचे चिरंजीवर गुरूदास सुतार आणि मॅकेनिकल इंजिनियरिंग अभ्यास क्रमात प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाल्याबद्दल निलेश हणमंत सुतार यांचा त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. विश्वकर्मा समाजातील तरूण पारंपारिक व्यवसायावर संक्रांत ओढवल्यामुळे शिक्षणाकडे वळले. त्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती साधत यश […]