समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
बेळगावहून निघालेली कार दरीत कोसळून पती -पत्नी जागीच ठार झाल्याची घटना चोर्ला घाटात घडली. लग्नाचा बस्ता खरेदीसाठी हे कुटुंब बेळगावला आले होते. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मेरशी – सांताक्रूझ येथील वाघमोडे कुटुंबीय शुक्रवारी (ता. 6) बेळगावला आले होते. रात्री उशिरा ते परतत असताना चोर्ला घाटातील अंजुने धरणाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. त्यात मोहन वाघमोडे (58) आणि त्यांची पत्नी रेणुका (48) हे जागीच ठार झाले. तर निवृत्ती वाघामोडे (57) व राणीबाई वाघामोडे (47) हे गंभीर जखमी झाले आहेत.
सदर वळणावर गेल्या सहा महिन्यात आठ अपघात घडले असून दहा जणांनी जीव गमावला आहे. त्यामुळे हे अपघातप्रवण क्षेत्र जाहिर करून याठिकाणी अपघातरोधक यंत्रणा कार्यन्वित करण्याची मागणी होत आहे.

रंगाचा बेरंग; गर्लगुंजीचा तरूण मलप्रभेत बुडाल्याचा संशय
समांतर क्रांती / खानापूर Girlgunji youth suspected of drowning in river malaprabha. मित्रासमवेत पार्टीसाठी आलेला गर्लगुंजीचा तरूण मलप्रभा नदीच्या पात्रात बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याचा शोध अग्नीशमन दल आणि पोलिसांकडून घेतला जात आहे. ऐन रंगपंचमीला घडलेल्या या घटनेने गर्लगुंजीत रंगाचा बेरंग झाला आहे. आज रंगपंचमीनिमित्त गर्लगुंजी येथील विशाल सातेरी बिर्जे (वय २४) हा […]