
समांतर क्रांती / खानापूर
Girlgunji youth suspected of drowning in river malaprabha. मित्रासमवेत पार्टीसाठी आलेला गर्लगुंजीचा तरूण मलप्रभा नदीच्या पात्रात बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याचा शोध अग्नीशमन दल आणि पोलिसांकडून घेतला जात आहे. ऐन रंगपंचमीला घडलेल्या या घटनेने गर्लगुंजीत रंगाचा बेरंग झाला आहे.
आज रंगपंचमीनिमित्त गर्लगुंजी येथील विशाल सातेरी बिर्जे (वय २४) हा तरूण मित्रांसमवेत पार्टीसाठी मलप्रभेच्या काठावर आला होता. तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र पाच मिनिटानंतर तो दिसेनासा झाल्याने घाबरगुंडी उडालेल्या त्याच्या मित्रांनी याची माहिती गावाकडे कळविली. ग्रा.पं. माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिस आणि अग्नीशामक दलाला दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस आणि अग्नीशामक दलाच्या जवानानी तातडीने मलप्रभेच्या पात्रात शोधकार्य हाती घेतले आहे.

गुढी पाडव्याला करणार होता व्यवसायाचा शुभारंभ, तत्पूर्वीच काळाने गाठले..
समांतर क्रांती / खानापूर girlgunji-youth-suspected-of-drowning-in-river-malaprabha. आताच कुठे त्याने व्यवसायात पाऊल ठेवले होते. गुढी पाडव्याला आपल्या व्यवसायाला शुभारंभ करायचा. त्यानंतर कुठे मित्रासमवेत फिरायला मिळणार आहे, असा विचार करून तो मित्रासमवेत पार्टीला आला होता. तसा पोहण्याचा अनुभव होता. पण, तरीही त्याला काळाने गाठलेच आणि रंगाचा बेरंग झाला. गर्लगुंजी येथील विशाल सातेरी बिर्जे (वय २४) याचा मलप्रभेत […]