
समांतर क्रांती / खानापूर
girlgunji-youth-suspected-of-drowning-in-river-malaprabha. आताच कुठे त्याने व्यवसायात पाऊल ठेवले होते. गुढी पाडव्याला आपल्या व्यवसायाला शुभारंभ करायचा. त्यानंतर कुठे मित्रासमवेत फिरायला मिळणार आहे, असा विचार करून तो मित्रासमवेत पार्टीला आला होता. तसा पोहण्याचा अनुभव होता. पण, तरीही त्याला काळाने गाठलेच आणि रंगाचा बेरंग झाला.
गर्लगुंजी येथील विशाल सातेरी बिर्जे (वय २४) याचा मलप्रभेत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ३.४५ वाजता त्याचा मृतदेह येथील घाटाजवळ अग्नीशामक दलाच्या जवानांना आढळला. आज तो त्याच्या मित्रांसमवेत पार्टीसाठी मलप्रभा नदी काठावर आला होता. दरम्यान, पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सुरूवातीला तो वर येईल, असे त्याच्या मित्रांना वाटले. पण, तो वर आलाच नाही. त्यामुळे तात्काळ ही माहिती गावाकडे कळविण्यात आली.
ग्रा. पं. माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ अग्नीशामक दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर लागलीच शोधकार्य हाती घेण्यात आले. अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी एकच अक्रोश केला. गर्लगुंजी कृषी पत्तीन संघाचे व्यवस्थापक सातेरी बिर्जे यांचा तो मुलगा होता.
विशाल याने आळंबी शेतीची सुरूवात केली होती. गुढीपाडव्याला तो या व्यवसायाचा अधिकृतपणे शुभारंभ करणार होता. पण, तत्पूर्वीच त्याला काळाने गाठल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून मृतदेह शासकीय इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी आणला आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
समांतर क्रांती / खानापूर Farmer injured in bear attack. सकाळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना माचाळी येथे घडली. या हल्ल्यात बाबल खांडेकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. लोंढा वनविभागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. बाबल खांडेकर हे सकाळी ७ च्या सुमारास शेताकडे जात होते. यावेळी झाडीत असलेल्या अस्वलाने […]