समांतर क्रांती / खानापूर

माचाळी येथे काल सकाळी अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पुन्हा तालुक्यात अस्वल हल्ल्याच्या घटना सुरु झाल्याने दहशत माजली आहे.
कोकणवाडा येथील शेतकरी महादेव सातेरी देसाई हे रात्री शेतात जात असताना अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. यावेळी शिताफिने त्यांनी हल्ल्यातून सुटका करून घेऊन गाव गाठले. त्यांना जखमी अवस्थेत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. भाजप नेत्या धनश्री सरदेसाई जांबोटीकर यांनी इस्पितळात त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा केली.
महादेव देसाई यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अस्वल त्यांच्या शेतात चिकूच्या बागेत वावरत होते. अगदी लोकवस्तीजवळ अस्वल आल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
