खानापूर: दुचाकीने कारला ठोकरल्याने झालेल्या अपघातात हेब्बाळ येथील शशिकांत यल्लाप्पा मादार (वय ४५) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मयत शशिकांत हे टिप्पर चालक होते, ते कामावर जात असतांना ही दुर्घटना घडली.
गोवा क्रॉसजवळच्या सेवा रस्त्याने चुकीच्या दिशेने बेळगाव-पणजी महामार्गावर आले असता लोंढ्याकडे निघालेल्या कारला शशिकांत यांच्या दुचाकीची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. कारमधील प्रवाशांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कारमधील बलून एअरबॅग खुल्या झाल्यामुळे सुदैवाने कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांआधी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

खानापुरातील नगरसेविकेच्या चिरंजीवाला ‘जेल’ची हवा
खानापूर: येथील माजी उपनगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका लक्ष्मी अंकलगी यांच्या चिरंजीव श्रीधर बसवराज अंकलगी (वय ३३) याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत सरकारी कामात व्यत्यय आणल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, शहराला लागून असलेल्या हलकर्णी फाट्यावरील एक हॉटेल […]