
समांतर क्रांती / खानापूर
A bike rider was injured after a tree branch fell on the Khanapur-Jamboti road. खानापूर – जांबोटी रस्त्यावर शुभम् गार्डननजिक झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज गुरूवारी (ता. ५) घडली. मोहन पाटील (बरगाव) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांना घटनेनंतर तात्काळ येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आहे.
मोहन पाटील हे दुचाकीवरून जात असतांना झाडाची फांदी त्यांच्यावर कोसळली. त्यात त्यांच्या डोकीला आणि हाताला जबर जखम झाली. याचवेळी जांबोटीकडे निघालेले लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी त्यांना तात्काळ इस्पितळात दाखल केले. यावेळी प्रवाशांनी झाडाची फांदी बाजुला सारून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.
