
समांतर क्रांती / अंकोला
The incident of a private bus leaving from Belgaum falling into a river took place early in the morning near Agsur in Ankola taluka. बेळगावहून निघालेली खासगी बस नदीत कोसळल्याची घटना पहाटेच्या सुमारास नदीत कोसळल्याची घटना अंकोला तालुक्यातील अगसूरजवळ घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर कारवार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमींमध्ये बेळगावमधील कांही जखमींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

बेळगावहून रात्री निघालेली खासगी बस अगसूर पूलाजवळ आली असता रस्त्यावरील खड्डे चुकवितांना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पूलाचे कठडे तोडून बस थेट नदीत कोसळली. झोपेत असलेल्या प्रवाशांना सुरूवातीला कांहीच कळले नाही. त्यानंतर एकच गोधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अंकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीत पडलेल्या बसमधून १८ प्रवाशांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले.

आज सकाळी ११ च्या सुमारास बस नदीतून बाहेर काढत असतांना एक मृतदेह आढळून आला. रात्री सदर इसमाचा मृतदेह कुणालाच दिसला नव्हता. अपघातानंतर त्याच्या डोकीला जबर मार बसून तसेच पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे. क्रेनच्या सहाय्याने बस पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. पोलिस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.


..म्हणे ९९ टक्के पेरण्या पूर्ण! कृषी अधिकारी ‘हाकत आहेत उंठावरून शेळ्या’
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यात सध्या शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण, एकतर यंदा भात पेरणीवर संक्रांत ओढवली; त्यात भात लागवड लांबली आहे. विशेष म्हणजे मजुरांअभावी भात रोपणीची कामे खोळंबली असतांना येथील कृषी अधिकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडत तालुक्यात चक्क ९९ टक्के पेरणी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांनी उंठावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार […]