
खुनाचा गुन्हा दाखल करून घेण्याची कुटुंबीयांची मागणी
समांतर क्रांती / खानापूर
A young boy from Manikwadi who was injured in an attack died. खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथील एका तरुणाला रुमेवाडी नाका येथील एका हॉटेल मालकाने मारहाण केली होती. वेंकटेश मल्हारी मयेकर (१८) असे या तरुणाचे नाव असून त्याला आठ दिवसापूर्वी जबर मारहाण करण्यात आली होती त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर बेळगाव येथील बीम्समध्ये उपचार सुरु होते. त्याचा बुधवारी ता रात्री मृत्यू झाला आहे याप्रकरणी खानापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.


बेळगावातील अपघातात कापोलीचा दुचाकीस्वार ठार
समांतर क्रांती / बेळगाव बेळगावातील गोवावेस येथे दुचाकीला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कापोली येथील सुनिल दिलीप देसाई (४२) हे जागीच ठार झाले. ही घटना आज गुरूवारी (ता.४) सायंकाळी चाडेचारच्या सुमारासस घडली. मयत सुनिल हे दुचाकीवरून आरपीडी क्रॉसहून गोवावेसकडे जात होते. यावेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकी चाकाखाली […]