
समांतर क्रांती / खानापूर
शेतकाम आटोपून घरी परतणाऱ्या शेतमजुराला ट्रॅक्टरने मागून जोराची धडक दिली. त्यानंतर कोसळलेल्या शेतमजुराच्या डोकीवरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर तेथेच सोडून पसार झाला. ही घटना लिंगनमठजवळील परिवार ढाब्यासमोर घडली. नागाप्पा रामचंद्र निलजकर (५५, रा. लिंगनमठ) असे मृताचे नाव आहे.

नागाप्पा हे सायंकाळी शेतकाम आटोपून घरी निघाले होते. मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्याना मागून जोराची धडक दिली. ते उडून पुढे पडले. चालकाने ट्रॅक्टर न थाबवता पुढे नेला. त्यात त्यांच्या डोकीवरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ट्रॅक्टर चालक पसार असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे.


चमकोगिरीसाठी मराठी शिक्षक-विद्यार्थी वेठीस; शिक्षणसंस्था चालकांची ‘कर्नाटकी’ मनमानी
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर नेहमीच ‘लाईम लाईट’मध्ये राहणाऱ्या शिक्षण संस्था चालकांनी ‘चमकोगिरी’ करीत मराठी भाषीक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याच्या घटनेबद्दल तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सदर संस्थेच्या अध्यक्षांचा सत्कार मंडळाच्या शाळांच्यावतीने आयोजित करण्यात आला. त्यात शिक्षकांना ‘लाल-पिवळा’ परिधान करण्याची सक्ती करण्यात आली होती. खानापूर तालुक्यातील जनतेने सुप आणि […]