समांतर क्रांती / खानापूर
हेम्माडगा रस्त्यावरील पाली परिसरात आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ओल्ड गोवा येथे राहणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत.मृत महिलेचे नाव जागृती हरिदास असे असून जखमी पतीचे नाव दत्तप्रसाद हरिदास आहे. हे दाम्पत्य सध्या गोव्यातील ओल्ड गोवा येथे वास्तव्यास होते.
खानापूर येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी आले होते. विवाह कार्यक्रम आटोपून कारने ओल्ड गोव्याकडे परतत असताना हेम्मडगा–अनमोड या धोकादायक रस्त्यावर समोरून येणाऱ्या अवजड वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला.कार रस्त्याच्या कडेला घसरून थेट झाडाला जोरदार धडकली. या अपघातात जागृती हरिदास यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती दत्तप्रसाद हरिदास गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अनमोड–हेम्मडगा मार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

खानापुरात रविवारी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन खानापूर: येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलमध्ये होणाऱ्या या परीक्षेला खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व […]