समांतर क्रांती / खानापूर
दूध वाहतूक करणारी रिक्षा पलटी झाल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नंदगड येथे घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून विद्यार्थी बालबाल बचावले.
कापोलीहुन नंदगडला येणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने कॉलेज आणि शाळेला येणारे विद्यार्थी दूध वाहतूक करणाऱ्या रिक्षात चढले. चन्नेवाडी फाट्याजवळ सदर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यावेळी रिक्षातील काही विद्यार्थी नाल्यात पडले तर काही जण रस्त्यावर पडले. केवळ सुदैवाने जखमी विद्यार्थी या अपघातातून बचावले.
जखमी विध्यार्थ्यांना तात्काळ बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नंदगड आणि नागरगाळी भागात जाणाऱ्या बहुतेक बसेस नादुरुस्त आहेत. परिणामी, बऱ्याच वेळा असे प्रसंग उद्भवतात. तसेच वेळेत बस नसल्याने विध्यार्थ्यांची परवड ही नेहमीचीच बाब बनली आहे. एकंदरच, बस सेवा रामभरोसे सुरु असून विध्यार्थ्यांचा जीव काडीमोल झाला आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी या समस्येकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दहावी परीक्षा : ६२५ पैकी २०६ मार्क्स मिळाले तरी पास..
समांतर क्रांती / बंगळूर शाळा शिक्षण आणि साक्षरता खात्याच्या प्रौढ शिक्षण परीक्षा मंडळाच्या कायद्यात बदल करण्यात आला असून यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांनी ६२५ पैकी २०६ म्हणजेच केवळ ३३ टक्के गुण मिळविल्यास उत्तीर्ण केले जाणार आहे. यापूर्वी किमान ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. काल गुरूवारी (ता.२४) याबाबत परीक्षा मंडळाने निर्णय घेतला असून १५ दिवसात यावर आक्षेप […]