समांतर क्रांती / खानापूर
अनमोड घाटातील रस्ता खचल्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. मात्र, सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी शुद्धीपत्रक जारी करत अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, सहाचाकी वाहतुकीसह अवजड वाहनांना परवानगी दिली आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाला सहा आणि चाकी वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्तीची कामे करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्ता अवजड वाहनांसाठी बंद झाल्यामुळे सर्वसामान्य जनता आणि मालवाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत होती, ती आता कमी होईल. अनमोड घाटातील भूस्खलनामुळे निर्माणझालेल्या सुरक्षिततेच्या कारणास्तव यापूर्वी अनमोड घाटावर दोन्ही बाजूंनी सर्व जड व्यावसायिक वाहनांची वाहतूक प्रतिबंधित केली होती. याच आदेशाला अनुसरुन दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून अनमोड घाट मार्गावर सहा चाकी वाहतूक वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देणारे शुद्धीपत्रक १२ रोजी जारी करण्यात आले होते.

माणिकवाडी खून प्रकरणातील आरोपी मोकाट; पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय
समांतर क्रांती / खानापूर माणिकवाडी येथील तरूण व्यंकाप्पा मल्हारी मयेकर (१८) याला मारहाण करून खून केलेल्या संशयीत आरोपींना १५ दिवसानंतरही अटक करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खानापूर पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त करीत माणिकवाडी ग्रामस्थानी जिल्हा पलिस प्रमुखांना निवेदन सादर करून संशयीतांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. १४ ऑगस्ट रोजी रुमेवाडी येथील […]