समांतर क्रांती / अनमोड
ब्रेक फेल झाल्याने खनिज वाहतूक करणारा ट्रक सुमारे 500 फूट दरीत कोसळला. ही घटना आज मंगळवारी (ता. 7) घडली. केवळ सुदैवाने अनर्थ टळला असला तरी ही डोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रामनगरहून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रकने (के ए 35-2581) अनमोड घाटात एका ओमिनीला धडक दिली. याच वेळी त्या ट्रॅकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक वळवीला. तो थेट दरीत कोसळला. पण, चालकाने ट्रॅकमधून उडी घेतली, त्यामुळे तो सुदैवाने बचावला असला तरी गंभीर जखमी अवस्थेत त्याला गोव्यातील बांबोळी येथील गोमेको इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त ट्रक सुमारे 500 फूट दरीत कोसळला असून तो बाहेर काढताना पराकष्टा करावी लागणार आहे. या घटनेत केवळ सुदैवाने ट्रक समोरील ओमिनी वाहन चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्यातील कुटुंबीय बचावले. गोवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

‘खानापूर बार’तर्फे सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध; तहसीलदारांना निवेदन
समांतर क्रांती / खानापूर देशाचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर माथेफीरू वकील राकेस किशोर तिवारी यांने चप्पल फेकण्याचा निंध प्रयत्न केला. त्या घटनेचा खानापूर वकील संघटनेने निषेध नोमदविला आहे. आज बुधवारी (ता.८) झालेल्या संघटनेच्या बैठकीत निषेधाचा ठराव समंत करण्यात आला. अध्यक्षस्थानी बारचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी होते. ॲड. पी.एन.बाळेकुंद्री यांनी ठराव मांडला तर ॲड. एच.एन.देसाई यांनी ठरावाला […]