समांतर क्रांती / खानापूर
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खानापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडीत अखेर माजी आमदार अरविंद पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांची पाचव्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवड झाली असून यावेळी त्यांची अविरोध निवड झाली आहे.
नुकताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी नंदगड येथील मार्केटींग सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांची अविरोध निवड करून विजयाची पताका फडकावली होती. आता त्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खानापूर तालुक्यातील कृषी पत्तीन संघांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक यांच्यासह जनतेच्या सहकार्यामुळे माझी पाचव्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवड झाली असून मी सर्वांच्या विश्वासास पात्र राहून यापुढेही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत राहणार, असलेल्याची प्रतिक्रीया त्यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना व्यक्त केली.
उद्या खानापुरात जल्लोषी मिरवणूक
मार्केटींग सोसायटी निवडडणुकीतील विजय आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या अविरोध निवडीबद्दल उद्या सोमवारी (ता. १३) खानापुरात शहरात माजी आमदार अरविंद पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोषी मिररवणुकीचे आयोजन केले आहे. मिरवणूकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकाच रात्री खानापूर तालुक्यातील सहा गावातील दहा घरांमध्ये चोरी
समांतर क्रांती / खानापूर Theft in ten houses in six villages of Khanapur taluka in one night खानापूर तालुक्यातील सावरगाळी, शिंपेवाडी, गुंजी, बरगाव, रामगुरवाडी आणि गणेबैलसह शहरातील दहा घरामध्ये एकाच रात्री चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून पोलिस खातेही चक्रावून गेले आहे. चोरीची पध्दत पाहता ही चोरी […]