जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सत्कार
समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील तरूणांमध्ये विविध क्षेत्रात चमकण्याची क्षमता आहे. अलिकडे क्रीडा क्षेत्रात तालुक्यातील अनेक तरूण चमक दाखवित आहे. शिक्षण क्षेत्रात सुध्दा तरूणांनी ठसा उमटविला आहे. तालुक्यात अनेकजण कथा, कांदबऱ्या, वैचारिक लेख, कविता लिहितात. त्यांचा शोध घेतला गेला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहीजे, असे मत माजी आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात माजी आ. अरविंद पाटील यांची पाचव्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह व प्रबोधन दिवाळी अंक देऊन सन्मानीत केले.
पुढे बोलतांना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, मोबाईलच्या अतिरेकामुळे वाचन संस्कृती मागे पडली आहे. वाचन संस्कृती लोप पावते की काय अशी स्थिती आहे. पण, मराठी प्रतिष्ठानने विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरूणांना वाचन संस्कृतीकडे परत आणण्याचे कार्य चालविले आहे. हे कार्य आश्वासक आहे. आम्ही नेहमीच या त्यांच्या कार्यात सहभागी राहू. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या सर्वांप्रति माजी आमदार अरविंद पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी तालुक्यातील विविध मान्यवरांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सचिव वासुदेव चौगुले यांनी सुत्रसंचालन तर उपसचिव प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.


जोयडा जात्यात, खानापूर सुपात..
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर सरकारच्या भपकेबाज योजनांमुळे नागरीक कसे अडचणीत येतात, याचा अनुभव सध्या जोयडा तालुक्यातील लोक घेत आहेत. तीच वेळ खानापूर तालुक्यावर सुध्दा येणार असली तरी नागरीक सरकारच्या भूलथापांना बळी पडतांना दिसत आहे. जोयडा जात्यात..वननिवासींचे अरण्यरुदन काळी व्याघ्र अभयारण्यातून जोयडा तालुक्यातील ६३० कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही ही प्रक्रिया सुरू आहे. स्थलांतरानंतर […]