
समांतर क्रांती / खानापूर
माजी आमदार अरविंद पाटील हे प्रचंड उर्जा लाभलेले नेते आहेत. जनतेची कामे करून देताना ते कधीच थकत नाहीत, म्हणून खानापूर तालुक्याच्या जनतेचे त्यांच्यावर प्रेम आणि विश्वास आहे. त्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी जनकल्याणाचे कार्य अविरतपणे चालविले आहे. ते भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाला बळ मिळाले. विठ्ठल हलगेकर यांना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे मत माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केले.
माजी आमदार अरविंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मलप्रभा हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी बोलतांना अरविंद पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला. धीर दिला, त्यामुळेच मला यशाचे शिखर गाठता आले. लोकसेवा हा माझा स्वभाव आहे. तो माझ्या शरीराचा एक भाग असल्याचे मी मानतो, त्यामुळे आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी जनतेच्या शुभेच्छा मला बळ देत राहतील आणि आगामी काळात सुध्दा मी जनसेवेसाठी कटीबध्द असेन.
आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरीला उत्स्फूर्द प्रतिसाद लाभला. शेकडो यावेळी तरूणांनी रक्तदान केले. यावेळी विविध संघ-संस्थांच्यावतीने माजी आमदार अरविंद पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, माजी जि.पं.सदस्य बाबुराव देसाई, मार्केटींग सोसायटीचे चेअरमन श्रीशैल माटोळी, भाजप नेते सुरेश देसाई, खानापूर को-ऑप बँकेचे चेअरमन अमृत शेलार, उपाध्यक्ष मेघश्याम घाडी, संचालक विजय गुरव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांकडूनही सदिच्छा..

यावेळी खानापूर तालुक्यातील पत्रकारांनीही माजी आमदार अरविंद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे, विवेक गिरी, चेतन लक्केबैलकर, वासुदेव चौगुले, संदीप सुतार, दिनकर मरगाळे, पिराजी कुऱ्हाडे, अल्ताफ बसरीकट्टी उपस्थित होते.
‘समांतर क्रांती’च्या विशेषांकाचे कौतूक..
माजी आमदार अरविंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘समांतर क्रांती’चा विशेषांक प्रकाशीत करण्यात आला. त्यात अरविंद पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडण्यात आले. या विशेषांकाचे वाचकांनी तोंड भरून कौतूक केले.
