समांतर क्रांती / बेळगाव
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीचे रान पेटले असून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. काल सोमवारी (ता.९) सकाळी माजी खासदार रमेश कत्ती यांनी अपहरण केलेल्या कृषीपत्तीन संचालकांची सुटका झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, दुपारी अथणी तालुक्यातील मदहळ्ळी येथे कृषीपत्तीनच्या संचालकाच्या पत्नीने पतीला चक्क पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्यासमोरच थोबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच तालुक्यात चुरस निर्माण झाली असली तरी निवडणूक अविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी आणि त्यांच्या बंधुंनी कंबर कसली आहे. दरम्यान, कांही तालुक्यात कृषीपत्तीन संघाच्या संचालकांना पळविण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारी (ता.८) माजी खासदार रमेश कत्ती यांनी सहा संचालकांचे अपहरण करून त्यांना साखर कारखान्यातील गेस्टहाऊसमध्ये ठेवण्यात आल्याची तक्रार यमकनमर्डी पोलिसात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या सहाही संचालकांची कत्तींच्या गेस्टहाऊससमधून सुटका केली. ही घटना ताजी असतांनाच दुपारी मदहळ्ळी हायड्रामा पहावयास मिळाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी जारकीहोळ्ळी आणि कत्ती यांच्यात जुंपली असून दररोज नवनवे कारनामे पहावयास मिळत आहेत.
पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी हे मदहळ्ळी कृषीपत्तीनच्या कार्यालयासमोर गेले असता त्यांचे समर्थन केलेले संचालक मारूती सनदी त्यांना सामोरे गेले. यावेळी अचानक तेथे आलेल्या त्यांच्या पत्नीने मारूती यांची कॉलर पकडून मंत्र्यांच्या समोरच त्यांच्या थोबाडीत मारण्यास सुरूवात केली. अचानक झालेल्या या प्रकाराने उपस्थित गोंधळून गेले. पोलिसांनी त्यांना आवरले. पण, बराचवेळ तेथे गोंधळ सुरू होता. त्यानंतर तेथे माजी खासदार कत्तीदेखील हजर झाले. त्यांनीही तेथे गोंधळ घातला. पण, त्यांना न जुमानता पालकमंत्री तेथून निघून गेले.

कालमणीतील सातेरी केळबाय पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
समांतर क्रांती / जांबोटी कालमणी येथील सातेरी केळबाय पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सत्यदेव नाईक होते. यावेळी वार्षिक ससर्वसाधारण सभेचे औचित्य साधून सभासदांना दुचाकींचे वितरण करण्यात आले. सुरूवातीला सेक्रेटरी मनोज गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक संचालक विजय चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून संस्थेने गेल्या सहा वर्षात केलेल्या प्रगतीचा […]