
समांतर क्रांती / खानापूर
शालेत चक्क मुख्याध्यापकाच्या टेबलवरच सापाने ठिय्या मांडल्याची घटना गवाळी येथील शाळेत घडली होती. त्यानंतर शहरापासून आवघ्या १२ कि.मी. अंतरावरील गावातील शाळेच्या परिसरातच अस्वलाच्या वावराने खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी अस्वलाच्या भितीने ‘तुमच्या मुलांना शाळेच्या वेळेतच पाठवा. वेळेपूर्वी पाठवू नका, तुम्ही स्वत: मुलांना शाळेत सोडा,’ असा संदेश मोबाईलवर पाठविला आहे.
जंगली श्वापदांनी तालुक्याच्या विविध भागात थैमान मांडले आहे. अस्वलांनी तर तालुकावासीयांचे जगणे मुश्किल केले आहे. गुंजी येथील शाळेजवळच्या हनुमान मंदिरात अस्वल दिसल्यानंतर ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे. शाळेच्या परिसरातही अस्वलांचा नेहमीच वावर असल्याचे आढळून आले आहे. त्याबद्दल गावात चर्चा होत असली तरी गोवकऱ्यांनी त्याची दखल घेऊन कांहीच हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभर शाळेतच कोंडून ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
खरंतर, ग्रामस्थ आणि शाळा सुधारणा समितीने वन खात्याला याबाबत माहिती देऊन अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणे, आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी मुलांना शाळेच्या वेळेतच शाळेला आणून सोडा, अशी विनंती पालकांना करावी लागत आहे. ही गंभीर बाब असून वनखाते तरी याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आठवडाभरापासून अस्वलाचा वावर
गेल्या आठवडाभरापासून दोन अस्वलांचा शाळा परिसरात वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. तशी चर्चादेखील गावात आहे. अस्वल शाळेजवळच्या हणुमान मंदिरात वास्तव्य करून होते. ते कांही नागरिकांनी पाहिले आहे. पण, याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. आधीच शाला इमारतीला गळती लागून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतांना ही नवीच समस्या उभी ठाकली आहे.

खानापूर आणि रामनगर पोलिसात १६ पेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्या गुंडावर गोळीबार
समांतर क्रांती / खानापूर खानापूरसह रामनगर पोलिस स्थानकात १६ हून अधिक गुन्हे दाखल असलेला गुंड प्रविण सुधीर (रा. रामनगर) याच्यावर सोमवारी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला आहे. तसेच यल्लापूर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक व तीन पोलिस कर्मचारी सुध्दा या घटनेत जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, रामनगर येथील गुंड प्रविण सुधीर […]