समांतर क्रांती / खानापूर
येथील क्षेत्रशिक्षणाधिकाऱ्यांनी ३० आदर्श शिक्षकांची यादी आज शिक्षक दिनी सायंकाळी जाहीर केली. त्यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व आदर्श शिक्षकांचा सत्कार उद्या शनिवारी (ता.६) येथील शनया पाल्ममध्ये होणाऱ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे.
विशेष म्हणजे पहिल्यांदा गवाळी आणि हुळंदसारख्या शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आल्याने ही कौतूकास्पद बाब समजली जात आहे. गवाळी शाळेचे मुख्याध्यापक शामराव जाधव आणि हुळंद शाळेच्या मीरा शिंत्री यांनादेखील पुरस्कार प्राप्त झाला आहे. इतरही २८ शाळांमधील शिक्षकांना पुरस्कार देण्यात यणार आहे.
आदर्श शिक्षकांची यादी खालीलप्रमाणे आहे..


एम.के.हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्याची निवडणूक २८ रोजी
समांतर क्रांती / खानापूर एम.के.हुबळी येथील श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २८ सप्टेबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक अधिकारी आणि कित्तूर विकास प्राधिकाराच्या आयुक्त प्रभावती फकीरपूर यांनी जारी केली आहे. अचारसंहिता जारी करण्यात आली असून खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा रंगणार आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १३ ते २० […]