
यल्लारी सुतार, माणिकवाडी
एखादी व्यक्ती स्वकष्टाने यशाचे शिखर गाठते, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या समाजाबद्दल, समाजातील रांजल्या-गांजल्या लोकांबद्दल कळवळा असतो. आपले हात आभाळाला पोहचलेले असतांनाही त्यांचे पाय मात्र जमिनीवरच असतात. अशी माणसच समाजात चमकत राहतात. असेच व्यक्तिमत्व म्हणजे श्री विश्वकर्मा समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोक कृष्णाजी सुतार. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासाचा घेतलेला हा आढावा..
खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील भुतेवाडी येथे १० डिसेंबर १९७४ रोजी वडील कृष्णाजी सुतार व आई रुक्मिणी सुतार यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. असे म्हटले जाते की मुलगा असो की मुलगी, जन्माला येताना सटवाई त्याच्या कपाळावर त्याचे आयुष्य आणि भविष्य लिहिते. तिने काय लिहिले हे कोणालाच माहीत नसते पण काही लोक मात्र स्वतःच आपले भविष्य घडवतात. तसेच ते पण घडले.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भुत्तेवाडी व नंदगड येथे झाले. दहावी १९९२ साली झाल्यानंतर घरची बेताचीच परिस्थिती असल्याने लगेचच मुंबईला कामाच्या निमित्त गेले. मुंबईत मिलमध्ये कामासाठी बोलावून प्रत्यक्षात मात्र हॉलमध्ये काम दिले गेले. मुबई सारख्या मोठ्या शहरात कोण आसरा देणारा नसल्याने जवळपास सहा महिने त्या हॉटेलमध्ये काम केले. जेवायला मिळते ही एकच जमेची बाजू होती. तेथून गोवा येथे त्यांच्या मामांकडे फर्निचर कामासाठी गेले. जवळपास दीड वर्ष काम केल्यानंतर १९९४ साली बेळगाव गाठले. त्यानंतर ते २००० सालापर्यंत मालवाहू गाडीवर रिक्षा ड्रायव्हर म्हणून उद्यमबाग येथे काम केले.
सुरूवातीला दुसऱ्याच्या गाडीवर व नंतर स्वतःच्या गाडीने काम केले. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला चांगले वळण लागले. २००० साल त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला. फक्त सोळाशे रुपये घेऊन जुने लाकूड खरेदी केले. लाकडाच्या उद्योगाला सुरुवात केली. १४ एप्रिल २००४ रोजी गावडे मिल चालवण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर धाडस, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर अनेक संकटांना दोन हात करीत ते स्थिरस्थावर झाले. पॅकींगच्या व्यवसायात जम बसविला. या व्यवसायाच्या शाखा बेळगाव व गोव्यामध्ये स्थापून अध्ययावत व नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून मशीनद्वारे पुणे, मुंबई, गोवा येथे सदर पॅकिंग क्रेट विक्री करतात.
आपली प्रगती झाल्यानंतर आम्ही ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे देणे लागतो, याची जाणिव असल्याने ते विश्वकर्मा संघाशी एकरूप झाले. या संघाची प्रगती व समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे करीत असतांना समाजाच्या विकासासाठी विश्वकर्मा विकास संघाच्या अध्यक्षपदाची धूरा सोपविण्यात आली.
या सर्व प्रवासामध्ये त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच ते यशाचे शिखर गाठू शकले. त्यांचे सामाजिक भान नेहमीच आमच्या संघाच्या कार्यकर्त्यांना आणि समाजातील तरूणांना प्ररणादायी ठरणारे आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दीक शुभेच्छा..!


एजंटनी डाव साधला, गवळीचा पाणी पुरवठा बंद केला
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर भीमगड अभयारण्यातील गवाळीसह 12 गावांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आहे. स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे भू माफिया वेगवेगळ्या प्रकारे स्थानिकांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच प्रत्यय गवाळी येथील नागरिकांना येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून तेथील लोक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहेत.गवाळी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. परिसरातून अनेक नाले वाहतात. पण सध्या […]