
समांतर क्रांती / नंदगड
खानापूर ते नंदगड आणि पुढे लिंगनमठपर्यंतच्या बससेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. खानापूर आगाराच्या मोजक्याच बसगाड्या या मार्गावर धावतात. त्यातही अनेक बस नादुरूस्त आहेत. अनियमीत धावणाऱ्या बसमुळे प्रवाशी आणि विशेषत: विद्यार्थ्यांची हेळसांड चालली आहे. बससेवा सुरळीत करण्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या मार्गावर हल्याळ आणि दांडेली आगाराच्या बस सुध्दा धावतात. मात्र, बिडीपासूनच या बस भरून येत असल्याने नंदगड, बिडी, बेकवाड येथील प्रवाशांना बसमध्ये चढायला सुध्दा जागा नसतो. खानापूर आगाराच्या ज्या मोजक्या बस आहेत, त्या बहुतेक बस अनियमीत आहेत. तसेच कांही बसेस बेकवाड आणि नंदगडवगळता मधल्या झुंजवाड, हेब्बाळ, लालवाडी, कौंदल किंवा करंबळला थांबविल्या जात नाहीत.
हडलगा, देवराई, मेरडा, नागरगाळी या बसदेखील वेळेत धावत नाहीत. सकाळी सात वाजल्यानंतर या मार्गावर बसची गरज असली तरी यावेळेत एकही बस नाही. हल्याळ – बारामती ही बसदेखील अनियमीत असल्याने बेळगावला सकाळी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बसमध्ये अक्षरश: प्रवाशी गुरांसारखे भरले जातात. विद्यार्थ्यांना तर बसच्या दरवाजात थांबून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
एकंदर, नंदगड भागातील बससेवेचा बोजवारा उडाला असला तरी तालुक्याचे आमदार राजकारणात रमले आहेत. त्यांना या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शिवाय बस आगार व्यवस्थापक या समस्येबद्दल अनभीज्ञ आहेत. बससेवा सुरळीत न केल्यास नंदगड येथे बसरोको आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरीकांनी दिला आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा गैरवापर; नोकरीचे आमिष दाखवून खानापुरातील अनेकांना लुटले

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा गैरवापर; नोकरीचे आमिष दाखवून खानापुरातील अनेकांना लुटले
Minister Lakshmi Hebbalkar’s name misused; Many people in Khanapur were robbed by luring them with jobs. समांतर क्रांती / बेळगाव राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा वापर करून अनेकांना लुटण्यात आल्याचा गौप्यस्फोट खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नोकरीचे आमिष दाखवून मंत्र्यांच्या जवळच्या माणसाने काव्या यळ्ळूर या […]