समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर 20 years ago, a helicopter crashed in the Khanapur forest. खानापूर तालुक्याच्या दाट जंगलाने वेढलेल्या आताच्या भीमगड अभयारण्याची दखल जगाला घ्यायला लवणारी घटना २००५ साली घडली. गोव्यातील दाबोळी विमानतळावरून उडालेले रशीयन कोमोव्ह २८ हेलिकॉप्टर गोव्यापासून ४० नॉटीकल मैल अंतरावर कोसळले. त्या घटनेला आज २० वर्षे म्हणजे दोन दशकं पूर्ण होत […]
एखादा माणूस किती प्रतिभावंत असावा? विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारी माणसं क्वचितच आढळतात. अशा माणसांच्या अंगी हे जे अष्टपैलू गुण असतात, ते वारसा हक्काने तर येतातच. शिवाय त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांच्या वर्तमानाला प्रकाशमय करून सोडतात. विशेष म्हणजे अशी माणसं समाजासाठी आदर्शवत दीपस्तंभ बनतात. असेच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे आबासाहेब नारायणराव दळवी. तेजस्वी यशाची गरूडभरारी घेतांना त्यांना त्यांच्या […]
समांतर क्रांती / युवा दिन विशेष ‘गिव्ह मी हंड्रेड युथ, आय वील चेंज द व्होल वर्ल्ड इन टू हेव्हन’ हे वाक्य वाचलं की हमखास डोळ्यासमोर येतात ते स्वामी विवेकानंद.पोरसवदा वयात अपार बुध्दीमत्ता बाणवलेले स्वामी विवेकानंद याच देशात होऊन गेले का? असा प्रश्नही सध्याच्या वर्तमानात विचारवंताकडून विचारला जातो. त्याबरोबर देशाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले जाते. तरूणांचा […]
वैशाली पाटील यांचे प्रतिपादन; नंदगड जेसीएस शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी खानापूर: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नेहमीच स्त्रियांची स्थिती बदलायची होती. त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका बनल्या. बालविवाहामुळे लहान वयातच मुली विधवा होत. बाल विधवांना मुंडन केले जात असे. लैंगिक शोषणही होत असे. सावित्रीबाईंनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. रुढी-परंपराना विरोध करून अथक परिश्रम […]
सीमाचळवळ / चेतन लक्केबैलकरगेल्या ६६ वर्षांपासून सीमावासीय मराठी जनता त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची चळवळ धगधगत आहे. पण, साडेसहा दशके या प्रश्नाचे भीजत घोंगडे का आहे? यावर तोडगा का निघाला नाही? तोडगा निघाला तरी प्रश्न जैसेथेच का? अनेकवेळा तोडगा निघाला तरी त्याला कुणी खो घातला? आणि का? सीमाप्रश्न नक्की आहे तरी काय? १ […]
जय महाराष्ट्र! बोला की, काय चाललंय? हा संवाद कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातला नाही. सीमाभागातील तरूणसुध्दा संभाषणाची सुरूवात ‘जय महाराष्ट्र’ने करतात. मराठी आपली मायबोली आहे, तीच्यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून आपले बापजादे खपत आले आहेत,याची जाणिव उशिरा का होईना सीमाभागातील तरूणांना होत आहे. इतकंच काय एरव्ही हॉटेलमध्ये चहाचे घोट रिचवितांना टवाळकी करणारे तरूणही सीमाप्रश्नावर भरभरून बोलतांना दिसताहेत. […]