समांतर क्रांती न्यूज कारवार: कुमठा आणि शिरसी परिसरातील पश्चिम घाटात काल रविवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. सुमारे ३ सेकंद मोठ्या आवाजासह भूकंपाचे धक्के बसल्याचे सांगितले जात असून यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण आहे.erthquake रविवारी अचानक उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमठा आणि शिरसी परिसरात कांही काळ जमिन हलल्याचा भास स्थानिकांना झाला. कुमठा-शिरसीदरम्यान सध्या सध्या […]
जांबोटी: चोर्ला महामार्गावर बसला टेंपोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेंपो चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी (ता. १०) घडली. यामुळे या मार्गावर तब्बल चार तास वाहयूक कोंडी झाली होती. अपघातस्थळापासून दोन्ही बाजुला लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कदंबा बस पणजीहून बेळगावकडे तर टेंपो बेळगावहून पणजीकडे निघाला होता. […]
आयपीएल बेटींगप्रकरणी आठ जणांवर कोलवा पोलिसांची कारवाई मडगाव: आयपीएल बेटींगप्रकरणी कोलवा पोलिस स्थानक हद्दीतील बाणावलीत आठ तरूणांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांकडून १८ लाखांचा मुद्दमाल जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये भूषण पुजारी, ॠषिकेश कृष्णाजी पाटील, कपिल सावंत, ओंकार प्रमोद पाटील, आद्गील नंदुबिल, तोहील बिडीकर, शुभम मनोहर पाटील, सय्यद रमजान बागवान (सर्व […]
पणजी: मराठी असे आमुची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी आझाद भवन पर्वरी येथील सभागृहात मराठी राजभाषा संमेलन होत आहे. महाकवी सुधाकर गायधनी हे संमेलनांचे उद्घाटक तर दिग्गज ज्येष्ठ साहित्यिक. गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. प्रकाश भगत हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष, पूर्णिमा देसाई या […]
समांतर क्रांती वृत्तपणजी: डिचोली संगम सेतुजवळ बेळगाव (कर्नाटक) येथील रमेश गवळी (वय ३५) याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.रमेश गवळी याचा मृतदेह सकाळी पुलाखाली आढळून आला. त्याच्या अंगावर सुरीने खुपसल्याचे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हा खुनच असल्याचे स्पष्ट झाल्याने डिचोली पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. रमेश […]
समांतर क्रांती वृत्त A landslide occurred near Dudhsagar, railway traffic stopped कॅसलरॉक: दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. दुपारी कॅसलरॉकपासून तिसऱ्या बोगद्याजवळ रेल्वे रूळावर दरड […]
समांतर क्रांती वृत्तबंगळूर: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद केली आहे. मागीलवेळी भाजपने ५०० कोटींची तरतूद केली होती. एकंदर, प्रत्येक सरकार म्हादई प्रकल्पासाठी निधीचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे. गोव्यातील सरकारने मात्र आतापर्यंत एक थेंबही पाणी वळवू देणार नसल्याच्या केवळ घोषणाच चालविल्या आहेत.
सदाहरीत जंगल झाडीतून गोवा राज्यात जाणारा चोर्ला महामार्गावरील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांच्या मनाला भूरळ घालत आले आहे. पावसाळ्यात पर्यटकांची मांदियाळी जमविणाऱ्या चोर्ला घाटातील विलोभनीय निसर्ग सौंदर्य पावसाळ्यानंतरही कांहीकाळ पर्यटकांना घाटात थबकायला भाग पाडते. गोव्याकडे जाणारा किंवा गोव्याहून धुंद होऊन परतणारा प्रत्येकजण घाटातील सौदर्याचा मनमुराद आनंद आणि अस्वाद घेताना दिसतो. नागमोडी वळणे, दाट जंगलझाडी त्यातून धबाबा […]
भक्ती आणि आधात्माच्या जोरावर अनेक महानुभवांनी जगाच्या उध्दारचा संकल्प केला आणि त्यासाठी त्यांचे जीवन समर्पित केले. समाजावर संस्कार करण्यासाठी त्यांचे संपर्ण जीवन खर्ची घातले. समाजाच्या विकासात-उन्नतीत अशा संत महात्म्यांचा वाटा महत्वाचा ठरला आहे. बालपणातच भक्ती आणि आधात्माकडे वळलेले बंगळूर येथील गोसावी महासंस्थान मठाचे पिठाधिपती जगद्गुरू वेदांताचार्य श्रीश्रीश्री मंजुनाथ भारती स्वामी यांनी संपूर्ण देशभरात त्यांच्या अगाध […]
खानापूर: गोव्याहून शिर्डीला निघालेल्या कारला बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या चेसीने जोराची धडक दिल्याने अपघात घडला. केवळ सुदैवाने कार दरीत कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही, असे वाळपई पोलीसांनी सांगितले. कारचे मात्र मोठे नुकासन झाले आहे. दरम्यान, अपघातानंतर चेसी चालकाने जंगलातून पळ काढला. पण त्याला केरी चेकपोस्टवर ताब्यात घेण्यात आले. अपघात […]