समांतर क्रांती / ब्युरो न्यूज सणासुदीच्या दिवसात नारळाची आवक वाढली असतांनाच दरही गगणाला भिडले आहेत. नारळाचे दर ५० रूपये झाला असून पहिल्यांदाच परराज्यातून नारळांची आयात करावी लागत आहे.छोटे नारळ सुध्दा ३५ ते ४० रुपयांना खरेदी करावे लागत आहेत. गोवा आणि कोकणात सुध्दा नारळाचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. या पार्श्वभूमीवर नारळांचे दर वाढले आहेत. सध्या […]
समांतर क्रांती / खानापूर भीमगड अभयारण्यातील गवाळी या दुर्गम गावातील मराठी शाळेत अनेक प्रयोगशील उपक्रम राबवून शाळेला प्रकाशझोतात आणणे, ही खरंतर कसरतच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुख्याध्यापक शामराव राजाराम जाधव यांनी हे शीवधणुष्य पेलत ही किमया साधली. त्याची दखल घेत शामराव जाधव यांना यंदाचा शिक्षण खात्याचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे […]
समांतर क्रांती / खानापूर एम.के.हुबळी येथील श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २८ सप्टेबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक अधिकारी आणि कित्तूर विकास प्राधिकाराच्या आयुक्त प्रभावती फकीरपूर यांनी जारी केली आहे. अचारसंहिता जारी करण्यात आली असून खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा रंगणार आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १३ ते २० […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आता अधिकृतपणे निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच जागांसाठी निवड अविरोध करण्यासाठी ‘सावकारां’नी शर्त चालविली असल्याने खानापूरच्या जागेचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्या अनपेक्षित माघारीने खानापूरच्या संचालकपदाच्या […]
समांतर क्रांती / खानापूर अनेक दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या मणतुर्गा येथील मराठी शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा संकल्प आज शुक्रवारी (ता.१५) स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. यावेळी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी शाळेच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या आवारात शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांच्याहस्ते करण्यात आले. तर महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष नारायण पाटील व डॉ. बाबासाहेब […]
समांतर क्रांती / बंगळूर शाळा शिक्षण आणि साक्षरता खात्याच्या प्रौढ शिक्षण परीक्षा मंडळाच्या कायद्यात बदल करण्यात आला असून यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांनी ६२५ पैकी २०६ म्हणजेच केवळ ३३ टक्के गुण मिळविल्यास उत्तीर्ण केले जाणार आहे. यापूर्वी किमान ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. काल गुरूवारी (ता.२४) याबाबत परीक्षा मंडळाने निर्णय घेतला असून १५ दिवसात यावर आक्षेप […]
समांतर क्रांती / खानापूर V.Y. Chavan Polytechnic to be inaugurated tomorrow in Khanapur. ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रशिक्षण मिळावे, यासाठी लोकमान्य एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या व्ही.वाय.चव्हाण पोलिसटेक्नीकचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (ता.२५) सकाळी ११ वाजता होणार आहे. राज्य प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे हे यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिक्षण समन्वयक डॉ. […]
समांतर क्रांती / खानापूर सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी निवडणुकांचे आयोजन केले जात आहे. येथील रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयातील नुकताच निवडणूक पार पडली. यावेळी उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघार घेणे, उमेदवारांना चिन्ह वाटप करणे, प्रचार यंत्रणा राबविणे, मतदान करण्यासाठी ओळख पत्र म्हणून आधार कार्डचा वापर करणे, मतमोजणी आणि सुरक्षा इत्यादी […]
समांतर क्रांती / बेळगाव शाळेतील पाण्याच्या टाकीत अज्ञातांनी किटकनाशक टाकल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात ही घडली आहे. किटकनाशक मिश्रीत पाणी पिल्याने १२ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. आज सोमवारी (ता.१४) हुल्लीकट्टी शाळेत पाणी प्यालेल्या १२ विद्यार्थ्यांना चक्कर आणि उलट्या व्हायला सुरूवात झाल्याने तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. […]
समांतर क्रांती / खानापूर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक अवस्थेत स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख झाल्यास भविष्यात त्यांना करिअरची वाट निवडणे सोपे ठरते. स्पर्धा परीक्षा, करिअर घडवण्याचे सर्वात उत्तम माध्यम आहे. त्या दृष्टीने पालकांनी अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी पोषक वातावरण निर्माण करावे. मनाजोगे करिअर निवडून समाज व राष्ट्रसेवेचा राजमार्ग […]