समांतर क्रांती / खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील पाली परिसरात आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ओल्ड गोवा येथे राहणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत.मृत महिलेचे नाव जागृती हरिदास असे असून जखमी पतीचे नाव दत्तप्रसाद हरिदास आहे. हे दाम्पत्य सध्या गोव्यातील ओल्ड गोवा येथे वास्तव्यास होते. […]
समांतर क्रांती / जोयडा तालुक्यातील पणसोली हत्ती शिबिरात वाढलेली ‘गौरी’ नावाची दोन वर्षांची मादी हत्ती आज आजारपणामुळे मृत्यूमुखी पडली. गौरीचा जन्म पणसोल्ली वन्यजीव वसाहतीतच झाला होता. गेल्या महिन्याभरापासून तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने सतत उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरीची शवचिकित्सा करण्यात आली असून, […]
समांतर क्रांती / खानापूर टिळकवाडी (बेळगाव) येथील दीराने वहिनीवर चाकूने तब्बल २० वार करून खून केल्याची घटना काल बुधवारी (ता.१०) घडली होती. त्यानंतर आज गुरूवारीला (ता.११) जोयडा तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमशेत – कोलेमाळ येथे दिराने वहिनीचा डोक्यात फावडे मारून खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली आहे. या घटनेने जोयडा तालुका हदरून गेला आहे. […]
समांतर क्रांती / जोयडा राज्याचे वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी पाळीव जनावरांना चरण्यासाठी जंगलात सोडण्यास बंदी घालण्याचा आदेश बजावला आहे. त्याचे तीव्र पदसाद पश्चिम घाट क्षेत्रात उमटत आहेत. या भागात राहणाऱ्या आदिवासी आणि शेतकरी समाजाबरोबर मुख्यत: धनगर गवळी या पशुपालक समाजावर या आदेशाचा परिणाम होणार आहे. कोणताही अभ्यास न करता काढलेल्या या अवैज्ञानिक […]
रामनगर / समांतर क्रांती बेळगाव – गोवा राष्ट्रीय महामार्गांवर जोयडा तालुक्यातील अनमोड येथे मिनी टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक बसून आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. मिनी टेम्पो हा हुबळी येथून प्लायवूड भरून गोव्यात जात होता, तर ट्रक हा गोव्यातून कर्नाटकात येत […]
हल्ल्याळ : येथून जवळच असणाऱ्या जोगनकोप्प येथे फुगा फुगविणे विध्यार्थ्याच्या जीवावर बेतले. सातवीत शिकणाऱ्या नवीन बेळगावकर या विध्यार्थ्याचा या घटनेत हाकनाक बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, नवीन हा काल रविवारी त्याच्या घरी फुगा फुगवत होता. यावेळी हवेने भरलेला फुगा त्याच्या घशात अडकला. तो अस्वस्थ झाल्याने कुटुंबियांनी तात्काळ फुगा घशातून […]
कुणबी समाजाच्या समस्या संसदेत मांडणार: डॉ. अंजली निंबाळकर खानापूर ब्यूरो न्यूज उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना मराठा समाजाने एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे युवा नेते रोहीत साठे यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे विरोधक भाजपचे नेते चांगलेच हडबडले आहेत. कारण, उत्तर कन्नड मतदार […]
जोयडा: रामनगर हनुमान गल्ली येथील प्राथमिक हिरीय सरकारी शाळेत माध्यन आहार बनविणाऱ्या महिला बेजबाबदारपणे काम करीत होत्या, त्यांच्यामध्ये वारंवार होणारे वाद यामुळे मुलांना योग्य दर्जाचे अन्न मिळत नव्हते, मुलांसाठी असलेल्या अन्न धान्याचा दुरपयोग होत होता, त्यामुळे शाळेत जेवण बनविणाऱ्या तिन्ही महिलांना कामावरून काढले आहे, यामध्ये कोणालाही जातीवरून त्रास दिला नाही, अशी माहिती शाळा विकास आणि […]