समांतर क्रांती / खानापूर माजी आमदारांबद्दल व्हाट्सॲप ग्रूपवर अपशब्द वापरल्याबद्दल दोघांना रात्रभर पोलिस स्थानकाची हवा खावी लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विधान परिषदेचे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्या नावे त्यांच्या समर्थकांचा व्हाट्सॲप ग्रूप आहे. त्या ग्रूपवर एका माजी अमदारांबद्दल अवमानकारक संदेश लिहिल्याने आमदार हट्टीहोळ्ळी यांचे समर्थक लोकोळी येथील संतोष पाटील […]
समांतर क्रांती / फोटो कॉर्नर एक छायाचित्र हजारो शब्दांचे काम करते, असे म्हटले जाते. त्याची प्रचिती अनेक ठिकाणी येत असते. पावसात भीजत भाषण करणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांची ती कृती भाव खाऊन गेली. अशीच घटना काल शनिवारी इटगी येथे पहावयास मिळाली. इटगीतील विद्यार्थी आणि पालकांनी धरणे आंदोलन […]
समांतर क्रांती / खानापूर गावकऱ्यांचच्या आंदोलनाला पाठिंबा देत अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माजी आमदार अरविंद पाटील यांनी आज एकत्रितपणे प्रस्तापित राजकरण्यांना धक्का दिला. इटगी येथील माध्यमिक शाळेचे स्थलांतर त्यांनी रोखले. दोनच दिवसात तसा आदेश जारी करण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा […]
समांतर क्रांती / खानापूर मोबाईलचा उपयुक्त माहिती व ज्ञानासाठी वापर करा. सोशल मीडियावर किमती वेळ वाया न घालवता ध्येय गाठण्यासाठी झपाटून प्रयत्न करा. प्रयत्नांना उशिरा सुरुवात केला तरी नियोजनबद्ध अभ्यास करून त्यामध्ये सातत्य ठेवल्यास यश निश्चितपणे मिळते, असे मत राज्यात नवव्या क्रमांकाने पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉ श्रुती पाटील यांनी दिला. येथील मराठा मंडळ शिक्षण […]
समांतर क्रांती / खानापूर माणिकवाडी येथील तरूण व्यंकाप्पा मल्हारी मयेकर (१८) याला मारहाण करून खून केलेल्या संशयीत आरोपींना १५ दिवसानंतरही अटक करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खानापूर पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त करीत माणिकवाडी ग्रामस्थानी जिल्हा पलिस प्रमुखांना निवेदन सादर करून संशयीतांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. १४ ऑगस्ट रोजी रुमेवाडी येथील […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील प्रत्येक सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे चांगले कार्य महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून खानापूर तालुक्यातील सरकारी मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण […]
समांतर क्रांती / खानापूर आठ दिवसांपूर्वीच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी येथील बस आगार व्यवस्थापकांना तालुक्यातील बससेवा सुरळीत करण्याची सूचना केली होती. पण, आगार प्रमुखांनी त्यांच्या सूचनांना चक्क वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून आमदारांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बस सोडण्याची मागणी करीत आगार प्रमुखांकडे गेलेल्या विद्यार्थ्यांना आज शुक्रवारी आगाराच्या गेटवरून अक्षरश: हाकलून लावण्यात […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर छ.शिवराय आणि छ. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भीमगड अभयारण्यातील कृष्णापूर ते वाळपई रस्त्याला दांडगा इतिहास लाभला आहे. शेकडो वर्षांपासून गोवा आणि खानापूरचे संबंध जोपासणारा हा मार्ग आता लवकरच बंद होणार आहे. लोंढा ते वास्को हा रेल्वे मार्ग आणि अनमोड आणि चोर्ला घाटातील महामार्ग सुरू होण्यापूर्वी गोव्याशी खानापूरचे दृढ संबंध […]
समांतर क्रांती / पणजी Aerial survey of Mhadei will be conducted, assures Goa Chief Minister म्हादई प्रश्नावर सरकार गंभीर आहे. या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष प्रयत्न केले जातील, तसेच प्रकल्पाचा एरियल सर्व्हे करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक सरकारशी बोलतील किंवा पत्रव्यवहार करतील, असे आश्वासन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले आहे. म्हादई […]
समांतर क्रांती / खानापूर काल मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर लावलेल्या होंडा व सुझुकी अशा दोन दुचाकी अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली. यामुळे हंदूर परिसरात घबराट पसरली आहे. सद्दाम अस्लम सय्यद यांच्या या दोन दुचाकी होत्या. केवळ सुदैवाने घराने पेट न घेतल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी हंदूर […]