समांतर क्रांती / खानापूर २२ सप्टेबरपासून राज्यभरात जातनिहाय जनगणना सुरू होणार असून खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने स्वत:ची माहिती देतांना जात मराठा. उपजात कुणबी आणि भाषा मराठी असा उल्लेख करण्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आवाहन केले आहे. आज येथील शिवस्मारकात सकल मराठा समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जातनिहाय जनगणनेसाठी ६० […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर हा वैशिष्ट्यपूर्ण तालुका असून येथील रेल्वे स्थानकाला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी रू. ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिली. येथील रेल्वे स्थानकावरील विकासकामांचे भूमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आदींसह […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्याला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्यात पोर्तुगीजांपासून ब्रिटीश राजवटींपासून जपून ठेवलेल्या ऐतिहासिक बाबींचा ऱ्हास कर्नाटक सरकारने चालविला आहे. १७५ वर्षांपासूनची मराठी माध्यमाची कॅसलरॉक येथील शाळा कर्नाटकी शासनाने बंद करून तेथे कानडी शाळा सुरू केली. आता तर १७ व्या शतकांपासून अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यावरही कर्नाटकी निर्बंध आले आहेत. हा ऐतिहासिक […]
समांतर क्रांती / खानापूर येथील सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक उद्या मंगळवारी (ता. १६) ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खानापूर शहर आणि तालुका परिसरातील मराठा समाजाला कशा पद्धतीने आपले नाव […]
समांतर क्रांती / खानापूर वारंवार होत असलेल्या अस्वलांच्या हल्ल्याबद्दल पश्चिम भागातील कणकुंबी-चोर्ला परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वनखात्याकडून अस्वलांना अवरले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड नाराजी पसरली असून आंदोलनाचा इशारा या भागातून देण्यात आला आहे. सहा महिन्यात तिसरा हल्ला काल रविवारी हुळंद येथील वासुदेव नारायण गावडे यांच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरू […]
समांतर क्रांती / खानापूर विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खानापूर को-ऑप बँकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार अशी चर्चा होती. त्यानुसार काल शनिवारी (ता. १३) झालेली सभा प्रचंड गदारोळात पार पडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी हस्तक्षेप करून शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या बँकेतील वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याने सभा कांही […]
समांतर क्रांती / खानापूर निवडणुकीनंतर येथील खानापूर को-ऑप बॅंकेत वादांची वावटळ उठली असून आज शनिवारी (ता.१३) होणारी तिसरी शतकोत्तर सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. चेअरमन आणि त्यांच्याच पॅनेलच्या संचालकांत धुसपूस सुरू असल्याने आजच्या सभेत अनेक प्रश्नांना चेअरमन अमृत शेलार यांना सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. बँकेत शेलारविरुध्द शेलार अशी स्थिती आहे. धाकट्या शेलारांनी […]
समांतर क्रांती / नंदगड वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (ता.१२) आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नंदगड भागातील शेतवडीत जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वनाधिकाऱ्यांना धारेवर धरत तुमच्या प्राण्यांना आवरा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा सज्जड इशाराच दिला. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अधिकाऱ्यांवर गरजले. त्यामुळे उपस्थित वन खात्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीदेखील पाचावर धारण बसली. गेल्या […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर शहर म्हणजे कचऱ्याचे आगार बनले आहे. शहराच्या प्रमुख चौकांसह उपनगरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पण, याकडे लक्ष द्यायला नगरसेवक आणि नगर पंचायत प्रशासनाला वेळच नाही. कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती, पण ती मोहीमही तकलादू ठरली आहे. शहरातील बसस्थानकासमोर मांगरीश हॉलच्या बाजुला परिसरातील दुकानदार बिनदिक्कत कचरा टाकत […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर स्थलांतराची भिती दाखवून भीमगड अभयारण्यातील शेतजमिनी लाटण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. गवाळी येथील जमिनींच्या प्रकरणाबाबत ‘समांतर क्रांती’ने आवाज उठविल्यानंतर आता भु-माफीयांचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. कुष्णापूर येथील १५० एकर जमिन भु-माफीयांनी आवघ्या कांही लाखात लाटली आहे. कुष्णापुरातील बहुतेक सुशिक्षीत तरूण गावाबाहेर असतात, त्याचाच गैरफायदा घेत भू-माफीयांनी तेथील अशिक्षित नागरीकांच्या […]