समांतर क्रांती / खानापूर Torture of minor girl; Youth from ‘Khanapura’ gets 20 years imprisonment अल्पवयीन तरूणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरूणास २० वर्षांचा सश्रम कारावास आणि २० हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने बजावली आहे. सदर प्रकरण २०२२ मध्ये घडले होते. अशोकनगर (ता. खानापूर) येथील प्रकाश सत्याप्पा मगदूम (२६) याने २०२२ साली एका अल्पवयीन तरूणीवर लैंगिक […]
समांतर क्रांती / खानापूर गावाचे स्थलांतर होणार असल्याचे सांगून एका भू माफीयाने भीमगड अभयारण्यातील शेतजमिनी लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच भू माफीयाने कांही वर्षांपूर्वी या परिसरात खाणकाम सुरू केले होते. आता पुन्हा त्यांने नागरीकांची दिशाभूल चालविल्याची चर्चा असून यामध्ये तहसील कार्यालयातील अधिकारीदेखील गुंतले आहेत. भीमगड अभयारण्यातील १३ गावांच्या स्थलांतराचा प्रयत्न सुरू आहे. १५ लाखांच्या बदल्यात […]
समांतर क्रांती / जांबोटी कालमणी येथील सातेरी केळबाय पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सत्यदेव नाईक होते. यावेळी वार्षिक ससर्वसाधारण सभेचे औचित्य साधून सभासदांना दुचाकींचे वितरण करण्यात आले. सुरूवातीला सेक्रेटरी मनोज गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक संचालक विजय चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून संस्थेने गेल्या सहा वर्षात केलेल्या प्रगतीचा […]
समांतर क्रांती / खानापूर गणेश विसर्जनावेळी शनिवारी मलप्रभेत बुडालेल्या यडोगा येथील संजय उर्फ शुभंम यल्लाप्पा कुप्पटगिरी (२२) याचा मृतदेह आज सोमवारी (ता.८) बंधाऱ्याजवळ सापडला. गेल्या दोन दिवसांपासून अग्नीशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी त्याच्या शोधासाठी प्रयत्न चालविले होते. शनिवारी (ता. ६) शुभम हा त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गणेश विसर्जनासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाला होता. त्यानंतर त्याचा […]
समांतर क्रांती / खानापूर गणेश चतुर्थीनिमित्त गावी येऊन दुसऱ्याच दिवशी तो पुण्याला परतला. घरातून त्याला आणखी कांही दिवस राहून जा, असे सांगण्यात आले. काम असल्याने जाणे गरजेचे आहे, असे सांगून तो निघाला. पण, त्याची ही गावभेट अखेरचीच ठरली. पुण्यात कामाला असलेल्या चापगाव (ता.खानापूर) येथील बळीराम यल्लाप्पा कदम याचा अपघाती मृत्यू झाला. पुण्याजवळील कात्रज बोगद्याजवळ शनिवारी […]
समांतर क्रांती / कणकुंबी कणकुंबी वनपरिक्षेत्रात चोर्लाजवळ दाट जाडीत झाडावर लटकलेल्या आवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहावर गुलाबी शर्ट आणि निळी पँट असून सदर व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काल रविवारी (ता.७) चोर्ला येथील गुराख्यांना झाडावर लटकणारा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ जांबोटी पोलिस चौकीला याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह […]
समांतर क्रांती / खानापूर भीमगड अभयारण्यातील गवाळी या दुर्गम गावातील मराठी शाळेत अनेक प्रयोगशील उपक्रम राबवून शाळेला प्रकाशझोतात आणणे, ही खरंतर कसरतच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुख्याध्यापक शामराव राजाराम जाधव यांनी हे शीवधणुष्य पेलत ही किमया साधली. त्याची दखल घेत शामराव जाधव यांना यंदाचा शिक्षण खात्याचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे […]
समांतर क्रांती / खानापूर गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना शनिवारी (ता.६) घडल्या. एका घटनेत यडोगा येथील तरूण शुभम यल्लाप्पा कुप्पटगिरी (वय २२) हा मलप्रभेत बुडाला, तर दुसऱ्या घटनेत बेळगाव शहरातील जक्कीनहोंडा तलावात बुडून राहूल बेकवाडकर (३३, रा. वड्डरवाडी) याचा मृत्यू झाला. या घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, गणेश […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील अनेक गावांच्या रस्त्यावर एखादी गणेशमूर्ती वर्षभर पहावयास मिळते. शेडू-मातीची ही मूर्ती पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो. त्याबद्दल अनेक तर्कवितर्क सुध्दा वर्तविले जातात. पण, आज आम्ही सांगतोय, यामागची सत्यकथा.. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंबी, पारवाड, चिखले, चिगुळे, हुळंद, मान, चोर्लासह अनेक गावांच्या रस्त्याकडेला गणेश मूर्ती दिसतात. कांहींना छोटेशे […]
समांतर क्रांती / खानापूर एम.के.हुबळी येथील श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २८ सप्टेबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक अधिकारी आणि कित्तूर विकास प्राधिकाराच्या आयुक्त प्रभावती फकीरपूर यांनी जारी केली आहे. अचारसंहिता जारी करण्यात आली असून खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा रंगणार आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १३ ते २० […]